Xiaomi कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Redmi 8 लाँच केला आहे. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत.

रेडमी 8 डिस्प्ले -कीमत :
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. यात तुम्ही ड्युअल सीमकार्डशिवाय मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकतात. ऑरा मिरर, रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

आणखी वाचा : TikTok ला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न, ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप खरेदी करण्याची तयारी

कंपनीकडून या फोनला कॅमेरा चँपियन असं नाव देण्यात आलं आहे. यात AI ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल Sony IMX363 प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल Portrait लेंस देखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात गुगल लेंस फीचर आहे. 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी यामध्ये असून 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. 12 ऑक्टोबरपासून या फोनची विक्री सुरू होत आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून एका विशेष ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. रेडमी 8 खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 लाख ग्राहकांना 7 हजार 999 रुपयांमध्ये 4 जीबी रॅम व्हेरिअंट दिलं जाईल. या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.