24 November 2020

News Flash

Xiaomi च्या ‘कॅमेरा चँपियन’ फोनचा सेल, किंमत 7,999 रुपयांपासून सुरू

ऑरा मिरर, रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध

Xiaomi कंपनीचा नवा स्मार्टफोन Redmi 8 च्या विक्रीसाठी आज एका सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. याच महिन्यात लाँच केलेल्या या फोनसाठी दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर सेलला सुरूवात झालीये. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत. कंपनीकडून या फोनला कॅमेरा चँपियन असं नाव देण्यात आलं आहे.

रेडमी 8 डिस्प्ले -कीमत व ऑफर्स –
रेडमी नोट 8 च्या 6जीबी+64जीबी व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये, 6जीबी+128जीबी व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 4GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये आहे. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर HDFC बँकेच्या युजर्सना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय अॅक्सिस बँकेचं डेबिट अथवा क्रेडिट कार्ड असलेल्यांना 5 टक्के सवलत मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. यात तुम्ही ड्युअल सीमकार्डशिवाय मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकतात. ऑरा मिरर, रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात AI ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल Sony IMX363 प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल Portrait लेंस देखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात गुगल लेंस फीचर आहे. 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी यामध्ये असून 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:16 pm

Web Title: xiaomi redmi 8 to go on sale know price offers and all specifications sas 89
Next Stories
1 फुंकर तीच असते…अमोल कोल्हेंचं ‘त्या’ मीम्सला सडेतोड उत्तर
2 दिवाळी भेट ! बहुप्रतिक्षित विमानसेवेला अखेर सुरूवात, नाशिक-पुणेकरांना दिलासा
3 मुस्लिम शेजारी दिवाळी साजरी करु देत नाही, अभिनेत्याची मोदींकडे तक्रार
Just Now!
X