‘शाओमी’ने भारतात नवीन स्मार्टफोन रेडमी 8A लाँच केला आहे. कमी किंमतीतला हा स्मार्टफोन म्हणजे Redmi 7A ची पुढील आवृत्ती आहे. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि mi.com वर हा सेल असेल.

वायरलेस FM रेडिओ –
शाओमीच्या Redmi 8A स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा (15.8 सेंटीमीटर) डॉट नॉच डिस्प्ले आहे. ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5’ चा सपोर्ट या फोनमध्ये असून Aura Wave ग्रिप डिझाइन आहे. AI फेस अनलॉक फीचर असलेल्या या स्मार्टफोनमध्ये वायरलेस FM रेडिओ देखील आहे. या स्मार्टफोनसाठी ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने वापरली आहे.

512GB पर्यंत वाढवता येणार स्टोरेज –
Redmi 8A मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीम आणि डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची मेमरी 512GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

मागील बाजूला 12MP कॅमेरा –
या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. फोनच्या पुढील बाजूला सेल्फीसाठी 8MP क्षमतेचा कॅमेरा आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सल क्षमतेचा Sony IMX 363 सेंसर आहे. यामध्ये AI पोट्रेट मोड आणि Type-C USB आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये स्प्लॅश-प्रूफ P2i टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा- क्रेडिट कार्ड नसेल तरी सणासुदीच्या काळात मिळणार एक लाखांचं क्रेडिट, कसं ते वाचा

किंमत –
6 हजार 499 रुपये इतकी या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आहे. 2GB रॅम + 32GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची ही किंमत आहे. तर, 3GB रॅम +32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तीन रंगात उपलब्ध असेल.