News Flash

चार रिअर कॅमेऱ्यांसह 5,020mAh ची बॅटरी, Xiaomi च्या नवीन फोनची किंमत 10 हजारांपेक्षा कमी

अ‍ॅमेझॉनवर प्राईम डे सेलमध्ये सुरू होणार नवीन फोनची विक्री...

Redmi 9 Prime या स्मार्टफोनने Xiaomi चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आहे.  नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जून महिन्यात स्पेनमध्ये लाँच झालेल्या Redmi 9 स्मार्टफोनप्रमाणेच आहेत. या फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर आहे.  क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपसह या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर,   फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर या फीचर्सचा समावेश आहे. हा फोन चार रंगांच्या पर्यायामध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 9 Prime भारतात मंगळवारी लाँच झाला. रेडमीच्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 6.53 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी 9 प्राइमच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर प्राईम डे सेलमध्ये (दि.6 ऑगस्ट) आणि mi.com वर फोनची विक्री सुरु होईल. कंपनी रेडमी 9 प्राइमसोबत बॉक्समध्ये एक कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर मोफत देत आहे. रेडमी 9 प्राइम हा फोन स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराइज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Redmi 9 Prime: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स:-
रेडमी 9 प्राइममध्ये कंपनीने 6.53 फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. या प्रोससरमुळे गेमिंगचा चांगला अनुभव मिळतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणं शक्य आहे, या फोनमध्ये ड्युअल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळेल.  रेडमी 9 प्राइममध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात AI सीन डिटेक्शन फीचर मिळेल. तर, सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वायरलेस एफएम रेडिओ, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 11:49 am

Web Title: xiaomi redmi 9 prime brings a full high definition display quad cameras and 5020mah battery at under rs 10000 sas 89
Next Stories
1 Oppo Reno 4 Pro चा आज पहिलाच ‘सेल’, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 स्वस्त Realme C11 खरेदी करण्याची आज संधी, कमी किंमतीत शानदार फीचर्स
3 आता फाइल शेअरिंगसाठी App ची गरज नाही, गुगलचं नवीन Nearby Share फीचर
Just Now!
X