Xiaomi कंपनीचा एक शानदार बजेट स्मार्टफोन आता स्वस्त झाला आहे. कंपनीने आपल्या Redmi 9 Prime स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच झालेल्या या फोनमध्ये कंपनीने क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020 mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

Redmi 9 स्पेसिफिकेशन्स :-
स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, मॅट ब्लॅक आणि सनराइज फ्लेयर अशा चार रंगांच्या पर्यायात फोन खरेदी करता येईल. Redmi 9 Prime या स्मार्टफोनमध्ये 128 जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज आणि 6.53 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. तर, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. या प्रोससरमुळे गेमिंगचा चांगला अनुभव मिळतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणं शक्य आहे, या फोनमध्ये ड्युअल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळेल. रेडमी 9 प्राइममध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात AI सीन डिटेक्शन फीचर मिळेल. तर, सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वायरलेस एफएम रेडिओ, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स आहेत.

आणखी वाचा- फक्त १० दिवसांमध्ये विक्रीचा आकडा २.५ लाखांपार, लेटेस्ट ‘स्वस्त’ स्मार्टफोनची कमाल

Redmi 9 नवीन किंमत :-
रेडमी 9 प्राइमच्या 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात झाली असून आता या फोनची किंमत 9,499 रुपये झाली आहे. तर, 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात झाली आहे. कपातीनंतर हा फोन आता 11 हजार 999 रुपयांऐवजी 10 हजार 999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असेल. नवीन किंमतीसह हा फोन शाओमीच्या अधिकृत वेबसाईट (एमआय डॉट कॉम) आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.