मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणारा फोन लाँच करण्याची स्पर्धाच लागली आहे. यामध्ये कोणतीच कंपनी मागे नाही. चिनी मोबाईल कंपनी शाओमीने दोन महिन्यांपूर्वी Redmi Go हा पाच हजारांपेक्षा स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनसाठी एक नवं व्हेरिअंट लाँच केलं आहे. 16GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या नव्या व्हेरिअंटची किंमत 4 हजार 799 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. याचं स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 128GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.  Mi.com, Mi Home Stores आणि अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावरुन हे नवीन व्हेरिअंट खरेदी करु शकतात.

Redmi Goचा HD डिस्प्ले 5 इंच (12.7 सेंटीमीटर) चा आहे.  याचे रिझोल्युशन 720×128 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये नाइट लाइट फीचरही देण्यात आले आहे. ड्युअल सिमसह मायक्रोएसडी कार्डसाठी स्लॉट देखील आहे. यामध्ये 3,000 mAh ची बॅटरी असून या बॅटरीचा स्टँडबाय टाइम 10 दिवसांचा आहे.साडेबारा तास फोनवर बोलू शकतो म्हणजेच कॉलिंग करू शकतो ऐवढी क्षमता या बॅटरीची आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे. तर, सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये MapsGo, GmailGo, YouTubeGo सारखे अॅप इनबिल्ट आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, ब्ल्यू-टुथ v4.1, FM रेडिओ, मायक्रो-युएसबी पोर्ट, GPS आणि 3.5mm ऑडिओ सॉकेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 हून अधिक प्रादेशिक भाषा आणि हिंदी गुगल असिस्टंटचा सपोर्ट देखील आहे.

यापूर्वी Redmi Go हा स्मार्टफोन केवळ 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होता. 1 जीबी व्हेरिअंट स्मार्टफोनची किंमत 4 हजार 499 रूपये आहे.