शाओमी कंपनीचे सर्वात पावरफुल स्मार्टफोन अशी ओळख असलेले Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीकडून या दोन्ही स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट दिले जात आहे. त्यामुळे Redmi K20 हा स्मार्टफोन 2,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांच्या बेसिक किंमतीत खरेदी करता येईल. तर, Redmi K20 Pro हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या बेसिक किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. पण, ही ऑफर केवळ १७ जानेवारीपर्यंत एसबीआय क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशिवाय mi.com या संकेतस्थळावरुनही खरेदी करता येतील.

रेडमी K20 के स्पेसिफिकेशन्स –

6.39 इंच AMOLED डिस्प्ले,
स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 एसओसी प्रोसेसर
128जीबी इंटरनल स्टोरेज
6जीबी रॅम
अँड्रॉइड 9 पाय(MIUI 10)
फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.

रेडमी K20 प्रो स्पेसिफिकेशन्स –
6.38 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले,
स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर,
8जीबी रॅम,
256जीबी इंटरनल स्टोरेज,
MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिम
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला Sony IMX586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता.