48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला Redmi Note 7 हा स्मार्टफोन अखेर चीनमध्ये लाँच झाला आहे. चीनची कंपनी शाओमीची नवी सब-ब्रँड कंपनी Redmi ने हा फोन लाँच केलाय. नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतातही लाँच करण्याची शक्यता आहे.

तीन व्हेरिअंट्स-
Redmi Note 7 मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असून यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आहे. Redmi Note 7 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4,000mAh पावरची बॅटरी आहे. दीड दिवसांपर्यंत ही बॅटरी टीकेल असा कंपनीचा दावा आहे. यात Type-C USB चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. तसंच क्वॉलकॉम क्विक चार्ज 4.0 सपॉर्ट आणि हेडफोन जॅक आहे.
Redmi Note 7 तीन व्हेरिअंट्समध्ये(3GB, 4GB आणि 6GB) उपलब्ध असेल. स्टोरेजसाठी यामध्ये 32GB आणि 64GB चा पर्याय आहे. फोनच्या मागील बाजूला ग्लास डिझाइन आहे. 3GB रैम आणि 32GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 7 ची चिनमध्ये 999 युआन इतकी किंमत ठेवण्यात आलीये. तर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 1,199 युआन, 6GB रॅम व 64GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 1,399 युआन आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 10,000 ते 14,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

14 जानेवारीपासून विक्री –
14 जनवरी 2019 पासून या स्मार्टफोनची चिनमध्ये विक्री सुरू होत आहे. या स्मार्टफोनसह कंपनीकडून 18 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. भारतीय बाजारात देखील 18 महिन्यांची वॉरंटी दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय कंपनीने Redmi Note 7 Pro ची घोषणाही केलीये. यामध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर असून चायनीज नववर्षानंतर हा स्मार्टफोन लाँच केला जाईल.