रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) या Xiaomi च्या लेटेस्ट स्मार्टफोनबाबत चांगलीच क्रेझ असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोन सर्वप्रथम 17 मार्च रोजी पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि दुपारी 12 वाजता सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या 90 सेकंदांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्याचा दावा कंपनीने केला. त्यानंतर, आज (दि.24) पुन्हा एकदा हा शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. तसेच यामध्ये 48MP प्रायमरी सेंसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

Redmi Note 9 Pro भारतीय बाजारात आज दुपारी 12 वाजेपासून दुसऱ्यांदा सेलमध्ये उपलब्ध असेल. Mi.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर हा सेल सुरू होत असून या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्सही आहेत. एचडीएफसीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सवलत मिळेल, तर एअरटेलच्या ग्राहकांसाठी दुप्पट डेटाची ऑफर आहे. एअरटेलच्या युजर्सना 298 आणि 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि एअरटेल थँक्सचाही लाभ मिळेल. तसेच, फोनच्या खरेदीवर ईएमआयचाही पर्याय आहे

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.