रेडमीचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसै खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या दोन ‘पॉप्युलर’ फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. Redmi Note 9 Pro Max आणि Redmi 8A Dual या दोन फोनच्या किंमती कंपनीने पुन्हा वाढवल्या आहेत. रेडमी नोट 9 प्रो मॅक्स 500 रुपये आणि रेडमी 8A ड्युअल 300 रुपयांनी महाग झाला आहे.

रेडमी 8A ड्युअल या फोनच्या केवळ 3जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत वाढली आहे. तर, रेडमी नोट 9 प्रो मॅक्सच्या दोन व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने रेडमी नोट 9 प्रो मॅक्सची किंमत लाँच झाल्यापासून दुसऱ्यांदा वाढवली, तर रेडमी 8A ड्युअलची किंमत याआधी दोन वेळेस वाढवण्यात आली होती, आता तिसऱ्यांदा हा फोन महाग झाला आहे. या दरवाढीनंतर लाँच झाल्यापासून आतापर्यंत रेडमी नोट 9 प्रो मॅक्स एकूण 2,000 रुपयांनी तर, रेडमी 8A ड्युअल एकूण 300 रुपयांनी महागला आहे.

Redmi 8A dual फीचर्स :-
या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22-इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असून 2 जीबी आणि 3 जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये VoWiFi फीचर देखील आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 8A dual मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल. Ai सीन डिटेक्शन आणि Ai पोर्टेट मोड असे फीचर्स कॅमेऱ्यासोबत आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन 18W फास्ट चार्जरसोबत येतो. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही देण्यात आलं आहे.

Redmi 8A dual नवीन किंमत –
Redmi 8A Dual (2GB+32GB): 7,499 रुपये
Redmi 8A Dual (3GB+32GB): 8,299 रुपये
Redmi 8A Dual (3GB+64GB): 8,999 रुपये

Redmi Note 9 Pro Max फीचर्स :-
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

Redmi Note 9 Pro Max नवीन किंमत :-
Redmi Note 9 Pro Max (6GB+64GB): 16,999 रुपये
Redmi Note 9 Pro Max (6GB+128GB):18,499 रुपये
Redmi Note 9 Pro Max (8GB+128GB):19,999 रुपये