‘शाओमी’चा बजेट स्मार्टफोन Redmi Note 9 खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी आहे. हा फोन आज (दि.13) दुपारी 12 वाजेपासून अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबासाइटवर सेलमध्ये उपलब्ध असेल.  48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अनेक फीचर्स आहेत. ‘नोट-9’ सीरिजमधील Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन स्मार्टफोनही भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. पण, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत  एकूण पाच कॅमेरे असलेला Redmi Note 9 हा स्मार्टफोन स्वस्त आहे.

Redmi Note 9 फीचर्स :-
ड्युअल-सिम रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. यात 6.53 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) आयपीएस डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर फीचर असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसर असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय मिळतील. आवश्यकता असल्यास माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड-कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह Redmi Note 9 मध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस यांसारख्या फीचर्सता समावेश आहे.

Redmi Note 9 किंमत:-
Redmi Note 9 (4GB रॅम + 64GB स्टोरेज) – 11 हजार 999 रुपये

Redmi Note 9 (4GB रॅम + 128GB स्टोरेज) – 13हजार 999 रुपये

Redmi Note 9 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) – 14 हजार 999 रुपये