Xiaomi कंपनीच्या Redmi Y2 आणि Mi TV 4 आणि TV 4A साठी आज फ्लॅशसेलचं आयोजन करण्यात आलं आहे. Redmi Y2 हा बजेट स्मार्टफोन जून महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. Redmi Y2 साठी amazon.in आणि mi.com वर आज दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू झाला आहे. तर, Mi TV साठी mi.com आणि Flipkart.com वर सेल आहे. तिन्ही प्रोडक्ट्सवर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू झाला आहे.

Xiaomi Redmi Y2 आणि Mi TV ची किंमत –
Redmi Y2 च्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दोन्ही व्हेरिअंट्स डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असतील. तर, Mi LED Smart TV 4A 32 ची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 43 इंच टीव्ही 22 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 55 इंच टीव्हीची किंमत 44 हजार 499 इतकी आहे.

Xiaomi Redmi Y2 चे स्पेसिफिकेशन –
या फोनला १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे २ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनला स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची मेमरी ३२ आणि ६४ जीबीवरुन २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. ३०८० मिलिअॅम्पियर्सची बॅटरीही देण्यात आल्याने हा फोन सध्या बाजारात असणाऱ्या इतर फोनला चांगलीच टक्कर देईल.