शिओमी कंपनीच्या रेडमी नोट ४ या मोबाईलची मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. केवळ ऑनलाईन उपलब्ध असलेल्या या फोनला त्याच्या आकर्षक फिचर्समुळे मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. याशिवाय शिओमीच्या इतरही फोनला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांतच कंपनी आपला रेडमी नोट ५ हे नवीन मॉडेल लाँच करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या बाजारात कोणताही फोन दाखल होण्याआधीच त्याच्याबाबतच्या चर्चांना उधाण येते. लवकरच कंपनी आपले हे नवीन मॉडेल चीनमध्ये लाँच करणार आहे.

विशेष म्हणजे फोन लाँच होण्याआधीच चीनच्या JD.com या वेबसाईटवर या फोनचे फिचर्स आणि किंमत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या फोनची स्क्रीन ५.९९ इंचाची असेल. नोट ४ प्रमाणेच १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. ३ जीबी आणि ४ जीबी रॅम असलेले हे फोन ३२ जीबी आणि ६४ जीबी इतक्याया मेमरीचे असतील. मध्ये ४ हजार मिलिअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. आता हा फोन भारतात नेमका कधी येणार याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

रेडमी मधील इन्फ्रारेड रिमोट फंक्शनशी सलग्न होणारे असल्याने अनेक टीव्ही, सेट टॉप बॉक्स, एअर कंडीशन्स, स्पीकर या फोनने ऑपरेट करता येतात. आयआर सेन्सर आणि मी रिमोट अ‍ॅप अनेक घरातील अप्लायन्सला सपोर्ट करतात. याशिवाय फोनची बॅटरी अतिशय चांगली असून, कॅमेरा आणि इतर फिचर्सही चांगले असल्याने ग्राहकांची शिओमीला पसंती असल्याचे दिसते. याबरोबरच रेडमी ४ ए हा फोनही सध्या तरुणांमध्ये बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर शिओमीच्या या नवीन फोनचा नक्की विचार करा.