लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमीने स्मार्टफोन बाजारात दबदबा निर्माण केल्यानंतर आता इतर क्षेत्रांकडे लक्ष वळवलंय. एअर प्युरिफायर (air purifier), स्मार्ट मॉब (smart mob), अ‍ॅक्सेसरीज (accessories) यांसारख्या प्रोडक्ट्सनंतर आता कंपनीने ‘स्मार्ट कप’ आणला आहे. या कपसाठी कंपनीने वायरलेस टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

पाहा फोटो : (देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

Gizmochina च्या रिपोर्टनुसार शाओमीने चीनमध्ये warm cup नावाचं नवं प्रोडक्ट आणलं आहे. हा एक वायरलेस कप असून 189 युवान ( जवळपास 2 हजार रुपये) इतकी याची किंमत ठेवण्यात आली आहे. वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांना चहा किंवा कॉफी गरम करण्यासाठी कप केवळ चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल. हा चार्जिंग पॅड म्हणजे कपावर किंवा खाली ठेवण्यासाठी दिलेलं एकप्रकारचं झाकण होय. हे तंत्रज्ञान दर्जेदार असून पारंपारिक पद्धतीपेक्षा सुरक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या फोनची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही चार्जिग पॅडचा वापर करत नसाल तर याचा वापर तुम्ही फोन चार्ज करण्यासाठी करु शकतात.

हा कप पूर्णतः वॉटरप्रूफ असून इतर सामान्य कपप्रमाणेच हा कपही साफ करता येतो. शाओमीने अद्याप हा कप केवळ चीनमध्येच लाँच केलाय. पण आपल्या इतर प्रोडक्ट्सप्रमाणे कंपनी हा कपही काही दिवसांमध्ये भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.