स्मार्टफोनच्या बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर चीनची कंपनी शाओमी आता वाहनक्षेत्रात उतरत आहे. कंपनीने दुचाकीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं असून आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर HIMO T1 लाँच केली आहे. सध्या ही स्कूटर(मोपेड) केवळ चीनमध्येच लाँच करण्यात आली आहे. जवळपास 2 हजार 999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 31 हजार रुपये इतकी या मोपेडची किंमत असण्याची शक्यता आहे. 4 जूनपासून या मोपेडची विक्री सुरू होणार आहे. चीनमधून सुरूवात केल्यानंतर कालांतराने कंपनी या दुचाकीचा विस्तार भारतीय बाजारपेठेतही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मोपेडमध्ये 14,000mAh क्षमतेची 13 लीथियम आयन बॅटरी आणि 350 व्हॅटची मोटार वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता यात आहे. या मोपेडमध्ये बॅटरीसाठी 14 Ah आणि 28 Ah अशे दोन पर्याय आहेत. पूर्ण चार्ज झाल्यानंतर 14 Ah बॅटरीद्वारे 60 किलोमीटरपर्यंतचा प्रवास आणि 28Ah बॅटरीद्वारे 120 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करता येईल असं कंपनीचं म्हणणं आहे.

स्पेसिफिकेशन
वजन- 53 किलोग्राम.
कलर- रेड, ग्रे, व्हाइट
लांबी-1515mm
रुंदी-665mm
ऊंची- 1025mm

फीचर्स
हाय-सेंसिटिव्ह डिजिटल डिस्प्ले
वन टच स्टार्ट बटन
मल्टी फंक्शनल कॉम्बिनेशन स्विच
90mm रुंदी टायर
पुढील बाजूला हायड्रॉलिक डिस्क ब्रेक
मागील बाजूला ड्रम ब्रेक सिस्टम