19 September 2020

News Flash

लाँचिंगआधीच Xiaomi Redmi 7 pro चे फीचर्स लीक

तर कंपनी हा हँडसेटला ११ वेगवेगळ्या रंगात लाँच करण्याची शक्यताही यामध्ये वर्तविण्यात आली आहे

बाजारात नव्याने येणाऱ्या एखाद्या नव्या मॉडेलचे फीचर्स लीक होण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसांत वाढले आहे. नुकतेच शाओमीच्या नव्याने दाखल होणाऱ्या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. कंपनीच्या Redmi 5 आणि Redmi 6 च्या सर्व मॉडेलना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी Redmi 7 pro लाँच करण्याच्या तयारीत होती. हा फोन प्रत्यक्ष बाजारात यायला वेळ लागणार आहे. मात्र त्याआधीच त्याची फीचर्स लीक झाली आहेत. मूळ चीनची वेबसाइट असलेल्या टीनावर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटच्या महत्वाची माहितीही लिक झाली आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार Redmi 7 pro मध्ये २.३ गीगाहर्ट्जचा ऑक्टाकोअर चिपसेट असेल. तर ३, ४ आणि ६ जीबी रॅमचे पर्याय असतील. तर ३२, ६४ आणि १२८ जीबीच्या मेमरीचीही सुविधा असेल. टीना या साईटवर हा मोबाईल ५.८४ एलसीडी डिस्प्लेसोबत लिस्ट करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हा मोबाइल २४ डिसेंबर रोजी बीजिंगमध्ये एका कार्यक्रमात लाँच होणार आहे. मात्र तो भारतात आणि इतर देशांमध्ये कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

तर कंपनी हा हँडसेटला ११ वेगवेगळ्या रंगात लाँच करण्याची शक्यताही यामध्ये वर्तविण्यात आली आहे. जर शाओमी ११ रंगात फोन बाजारात उतरवणार असेल तर शाओमीच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड जमा होणार आहे. हा मोबाइल ब्लॅक, पांढरा, ब्लू, रेड, पिवळा, पिंक, ग्रीन, गोल्ड, पर्पल, सिल्वर आणि ग्रे रंगात लाँच करण्यात येणार आहे. आता लीक झालेल्या फीचरप्रमाणेच या फोनचे फीचर आहेत का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:50 pm

Web Title: xiaomis redmi 7 pro features leak on tenaa website in china
Next Stories
1 फसवणूक थांबणार, गुगल मॅपच रिक्षाचे भाडे सांगणार
2 ख्रिसमसच्या सुटीत ट्रीप प्लॅन करताय? मग या टीप्स वाचाच…
3 मायक्रोमॅक्सने लाँच केले दोन नॉचयुक्त बजेट स्मार्टफोन
Just Now!
X