25 March 2019

News Flash

शाओमी रेडमी ५ ची प्रतिक्षा संपणार; लाँचिंगची तारीख ठरली

भारतातही होणार उपलब्ध

शाओमी कंपनीच्या रेडमी नोट ४ या मोबाईलची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. सुरुवातीला केवळ ऑनलाईन उपलब्ध असलेल्या या फोनला त्याच्या आकर्षक फिचर्समुळे ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली. याशिवाय शाओमीच्या इतरही फोनला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून कंपनीचा रेडमी नोट ५ हा फोन बाजारात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र आता या फोनच्या लाँचिंगची अधिकृत तारीख ठरली आहे.

उद्या म्हणजेच १४ मार्च रोजी कंपनी भारतात हा फोन लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जगभरातील ग्राहकांबरोबरच भारतीय ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. ग्राहकांमध्ये उत्सुकता कायम रहावी यासाठी कंपनीने या फोनच्या फिचर्सबाबत अजूनही कोणती माहिती दिलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लिक झाले होते. अॅमेझॉन इंडियावरुन ग्राहकांना उद्यापासून हा फोन खरेदी करता येणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. एमआय डॉट कॉमवरुन या स्मार्टफोनच्या लाँचिंगचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. त्यामुळे लाँचिंगचा कार्यक्रम पाहण्याची संधीही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. शाओमी रेडमी ५ स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यातच लॉन्च करण्यात आला आहे. मात्र आता तो आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध होईल.

या फोनला ४ हजार मिलीअॅम्पियरची बॅटरी देण्यात आली असून त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातला एक कॅमेरा १६ मेगापिक्सेल आणि दुसरा ५ मेगापिक्सेल असण्याची शक्यता आहे. या फोनचा डिस्प्ले ५.९९ इंचांचा असेल. ३ जीबी रॅमचा ३२ जीबी मेमरी असलेला आणि ४ जीबी रॅमचा ६४ जीबी मेमरी असलेले असे दोन क्षमतांचे फोन उपलब्ध आहेत. याशिवाय १२८ एक्स्पांडेबल मेमरी असेल असेही सांगण्यात आले आहे. काळा, रोज गोल्ड, निळा, लाल, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे अशी माहिती ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस व्हायरल झाली होती. या तीनही व्हेरिएंटच्या किंमती ८ हजारांपासून ११ हजार रुपयांच्या दरम्यान असतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात, आता १४ मार्च रोजीच या स्मार्टफोनचे नेमके फीचर्स आणि किंमती समोर येतील.

First Published on March 13, 2018 1:52 pm

Web Title: xiomi redmi 5 launch in india soon good news for customers