05 April 2020

News Flash

Yamaha ची जबरदस्त Majesty S 155 स्कूटर , जाणून घ्या खासियत

Yamaha ची मॅक्सी-स्टाइल स्कूटर...

Yamaha ने एक नवीन स्कूटर Majesty S 155 आणली असून कंपनीने ही स्कूटर जपानमध्ये सादर केली आहे. 2020 कंपनीची ही मॅक्सी-स्टाइल स्कूटर ऑटो एक्सपोमध्ये सादर झालेल्या Aprilia SXR160 पेक्षा अधिक पॉवरफुल आहे. Yamaha Majesty S स्कूटरची प्रोफाइल बोल्ड असून फ्रंटमध्ये स्टायलिश एप्रन माउंटेड एलईडी हेडलाइट आहेत. त्यामुळे स्कूटरला जास्त आकर्षक लूक मिळालंय. हाय-राइज्ड पिलियन सीटमुळे स्कूटरचं आक्रमक लूक अजून उठून दिसतं. याशिवाय, अ‍ॅलॉय व्हील्स, ब्लॅक साइड माउंटेड एग्जॉस्ट आणि ब्लॅक-येलो कंट्रास्ट कलर स्क्रीममुळे स्कूटरला एकूणच स्पोर्टी लूक मिळालंय.

फीचर्स आणि इंजिन :-
Majesty S 155 या स्कूटरमध्ये पेट्रोल टाकी 7.4-लीटर क्षमतेची देण्यात आलीये. तर, 40 किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Yamaha Majesty S स्कूटरमध्ये स्पोर्टी लूक असलेले 3-पॉड सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्रंट एप्रनमध्ये 12V DC सॉकेट, फ्रंट फ्युअल फिलर कॅप आणि अ‍ॅल्युमिनियम हुक यांसारखे फीचर्स आहेत. पुढील बाजूला 267 mm आणि मागे 245 mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच, सीटखालीही जास्त मोकळी जागा आहे. या नव्या स्कूटरमध्ये 155cc, सिंगल-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 7,500rpm वर 15 PS ची ऊर्जा आणि 6,000rpm वर 14Nm टॉर्क निर्माण करते. तर, एप्रीलिया SXR160 मध्ये 160cc क्षमतेचं इंजिन असून ते इंजिन 11.01 PS ची ऊर्जा आणि 11.6 Nm टॉर्क निर्माण करते

किंमत आणि उपलब्धता :-
जपाननंतर कंपनी ही स्कूटर अन्य देशांमध्येही लाँच करणार असल्याची माहिती आहे. यात जपाननंतर मलेशिया आणि फिलीपीन्समध्ये ही स्कूटर लाँच होईल असं समजतंय. भारतातही स्कूटरचं मार्केट वाढत असल्याने ही स्कूटर भारतात लाँच करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. Yamaha Majesty S 155 स्कूटरची किंमत 3,45,000 जपानी येन म्हणजे जवळपास 2.4 लाख रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 10:44 am

Web Title: yamaha majesty s 155 maxi scooter launched in japan know price specifications and all other details sas 89
Next Stories
1 Redmi ने आणला टेबिल टेनिसच्या बोर्डऐवढा Smart TV, वाचा किती आहे किंमत?
2 भारतीय लष्कर अशा प्रकारे करते हँड सॅनेटायझिंग, सोशल मीडियावर व्हिडओ व्हायरल
3 Coronavirus: खरी मर्दानी! २६३ भारतीय विद्यार्थ्यांना इटलीतून मायदेशी सुखरुप परत घेऊन आली
Just Now!
X