Yamaha ची भारतातील लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक Yamaha YZF-R15 V3.0 महाग झाली आहे. 2008 साली लॉन्च झाल्यापासून एंट्री लेवल स्पोर्ट्स बाइक्समध्ये Yamaha YZF-R15 V3.0 चांगलीच लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही बाइक कंपनीने इंजिनसाठी लागू झालेल्या नवीन निकषांसह म्हणजेच अपडेटेड बीएस-6 इंजिनमध्ये लॉन्च केली. त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.
Yamaha YZF-R15 V3.0 ही बाइक रेसिंग ब्लू, थंडर ग्रे आणि डार्कनाइट अशा तीन कलर व्हेरिअंटमध्ये भारतात उपलब्ध आहे. कंपनीने या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली आहे. यामाहा YZF-R15 V3.0 मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. यात एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, USB चार्जर , स्लिपर क्लच, ड्युअल हॉर्न, रेडियल ट्युबलेस टायर, साइड स्टँड इनहॅबिटर यांसारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाइकमध्ये ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. या स्पोर्ट्स बाइकमध्ये 155cc, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून 6-स्पीड गिअरबॉक्स आहेत. फ्युअल-इंजेक्शन सिस्टिम असलेलं हे इंजिन 19hp ची ऊर्जा आणि 14Nm टॉर्क निर्माण करतं.
किंमत :-
कंपनीने या बाइकच्या नवीन किंमती आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केल्या आहेत. यामाहा YZF-R15 V3.0 बाइकच्या सर्वात लोकप्रिय रेसिंग ब्लू कलर व्हेरिअंटची किंमत कंपनीने एक हजार रुपयांनी वाढवली आहे. आधी या कलर व्हेरिअंटची किंमत 1,45,900 रुपये होती. पण आता तुम्हाला या बाइकसाठी 1,46,900 रुपये मोजावे लागतील. तर, थंडर ग्रे कलर ऑप्शनची किंमत आधी 1,45,300 रुपये होती, पण आता 1,45,800 रुपये झाली आहे. या बाइकच्या किंमतीत कंपनीने 500 रुपयांची वाढ केली आहे. तर, डार्क नाइट कलर व्हेरिअंटच्या किंमतीतही कंपनीने 600 रुपयांची वाढ केली असून ही बाइक आता 1,47,900 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 4:33 pm