News Flash

मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणारी सोप्पी योगासने!

मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी, आपल्या जीवनशैलीमध्ये योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे.

जास्त मेहनत न घेता करता येणारी ही आसने आहेत.( फोटो : Pexeles )

देशभरात, बरेच लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. विशेषत: साथीच्या आजारात त्यांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी काही विशिष्ट जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. यासाठी योगापेक्षा काय चांगले असू शकते? हिमालयीन सिद्धा ग्रँड मास्टर अक्षर यांनी इंडियन एक्सप्रेससोबत महत्त्वाची योगासने शेअर केली आहेत. जाणून घेऊयात मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्प्या योगासनांची यादी आणि त्यांचे महत्त्व. ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फार मदत होते. जास्त मेहनत न घेता करता येणारी ही आसने आहेत.

१.कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. प्राणायामने मनाला शांती मिळते.

२. सुप्त मत्स्येन्द्रसन

सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूप चांगले आहे.

३. धनुरसन

या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते.

४. पाशिमोत्थानना

हे आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पश्चिमोत्नासन शरीरातील महत्वाची उर्जा वाढवते आणि मनाला शांती प्रदान करते.

५. अर्ध मत्स्येंद्रासन

हे आसन ओटीपोटाच्या अवयवांची मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. अर्ध मत्स्येंद्रासन मणक्याला देखील बळकट करते. हे योग आसन केल्याने मन शांत होते आणि रीढ़च्या हाडाच्या की भागात रक्त प्रसारित करण्यास मदत करते.

६.शवासन

शवासन संपूर्ण शरीराला विश्रांती देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत नेते, ज्यामुळे मन शांत होते आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 1:27 pm

Web Title: yoga asanas that can help diabetes patients make healthy lifestyle ttg 97
Next Stories
1 जागतिक युवा कौशल्य दिन २०२१: तरुणांसाठी सरकारच्या ‘या’ आहेत कौशल्य विकास योजना!
2 मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात ‘या’ ५ गोष्टींचा करा समावेश!
3 काही लोकांना डास जास्त का चावतात? जाणून घ्या!
Just Now!
X