योगासने केल्याने नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होत असल्याचे नव्या अभ्यासात आढळले आहे. मानसिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी भारतायांची ध्यान करण्याची परंपरा अतिशय प्रभावी असल्याचे संशोधकांनी सांगितले.

योग केल्याने त्याचा नैराश्य कमी करण्यावर नक्की काय परिणाम होतो तसेच योगामध्ये शारीरिक व्यायाम आणि श्वासोच्छ्वास घेणे आणि चिंतन करणे यावर अधिक भर दिल्याने नेमके काय बदल घडून येतात यावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले होते.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

योग करणे हे पश्चिमेकडे अधिक प्रसिद्ध झाले आहे. अनेक नव्याने योग करणारे लोक हे ताणतणाव कमी करण्यासाठी आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करत आहेत, असे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील आरोग्य केंद्राच्या लिंडसे हॉपकिन्स यांनी म्हटले आहे.

असे जरी असले तरी योग करण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबतचे संशोधन सध्या मागे पडल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासामध्ये २३ पुरुषांना आठवडय़ातून दोन वेळा असे आठ आठवडे योग करण्यास सांगितले. आठ आठवडय़ांनंतर यातील अनेकांमध्ये सुरुवातीला असलेली नैराश्याची लक्षणे मोठय़ा प्रमाणात दूर होण्यास मदत झाल्याचे आढळून आले.

अभ्यासाच्या सुरुवातीला सहभागी पुरुषांमध्ये असलेली नैराश्याची पातळी मोजण्यात आली. तसेच योग सुरू केल्यानंतर तीन, सहा आणि नऊ आठवडय़ांनंतर त्यांच्यामध्ये असणारी नैराश्याची पातळी मोजण्यात आली. आठ आठवडय़ांनंतर ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यांच्या तुलनेमध्ये सहभागी झालेल्या पुरुषांच्या नैराश्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले.