23 November 2017

News Flash

एकाग्रता वाढविण्यासाठी करा स्वस्तिकासन

इतर समस्यांसाठीही उपयुक्त

सुजाता गानू-टिकेकर | Updated: September 14, 2017 1:52 PM

स्वस्तिकासनातील योगस्थिती

स्वस्तिक हे कल्याणकारी चिन्ह आहे. बैठक स्थितीत शरीराची कल्याणकारी स्थिती घेणे म्हणजेच स्वस्तिकासन करणे होय. हे बैठकस्थितीतील आसन आहे. प्रथम पाय पसरून ताठ बसावे, नंतर उजव्या पायाची टाच डाव्या जांघेत बसवावी आणि डाव्या पायाची टाच वरून उजव्या जांघेत बसवावी. हाताची ज्ञानमुद्रा ठेवून समोर पहावे. या आसनात कितीही वेळ स्थिर रहाता येते. आता डाव्या पायाने वरील कृती करावी. चित्त एकाग्र होण्यासाठी हे आसन चांगले आहे. खूप श्रमाने पाय दुखत असतील तर या आसनात बसावे. सुरुवातील पंधरा सेकंद बसावे. नंतर कालावधी तीन मिनिटांपर्यंत वाढवावा. तीन महिने हे आसन नियमितपणे केल्यास तुम्हाला जास्त तास एका ठिकाणी बसण्याची सवय लागेल. पद्मासनापेक्षा बसण्यास सोपे असे हे आसन आहे.

स्थुलता आणि दम्याचा त्रास आहे? हे आसन करुन पाहा

स्वस्तिकासनात छाती आणि दंड सरळ ठेवावेत. मन शांत आणि स्थिर रहाण्यासाठी स्वस्तिकासन प्रभावी आहे. भजन, कीर्तनसमयी स्वस्तिकासन घालण्याची पद्धत आहे. लहान मुलांच्या मनाची चंचलता या आसनाने दूर होते. करायला सोपे असे हे ध्यानात्मक आसन आहे. यामुळे हाता-पायांचे स्नायू मजबूत होतात. चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता येते, कारण एकाग्रतेमुळे मनाचा समतोल रहातो. ताणतणाव दूर करण्यासाठी सर्वांनी रोज करावे असे हे योगासन आहे.

सुजाता गानू- टिकेकर, योगतज्ज्ञ

First Published on September 14, 2017 1:00 pm

Web Title: yogasan good for health concentration swastikasan