दम्याचा त्रास असणाऱ्यांनी थंडी, पाऊस आणि धूळ यापासून विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अँटिबायोटीक्स किंवा इनहेलरने याचा त्रास काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो. मात्र अचानकपणे हा त्रास कधी कसा उद्भवेल सांगता येत नाही. तसेच औषधांनी आणि इनहेलरने तात्पुरता आराम मिळतो. मात्र हा त्रास मूळातून नष्ट करायचा असेल तर योगासनातील ‘शशांकासन’ उपयुक्त ठरते. दिर्घकाळ दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे.

प्रथम बैठक स्थितीत यावे. बैठक स्थितीतून वज्रासनात जावे, दोन्ही पाय मागे घेऊन टाचांच्या अर्धचंद्रात बसावे. श्वास घ्यावा आणि श्वास सोडत दोन्ही हात सरळ जमिनीकडे न्यावे. श्वास सोडतच कमरेतून खाली वाकावे, डोके गुडघ्याला लावून किंवा गुडघ्याच्या पुढे जमिनीवर टेकवावे. हात लांब केलेल्या अवस्थेत हाताची कोपरे थोडीशी वाकवून आसनस्थिती पूर्ण करावी. कपाळ जमिनीला टेकवून आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रीत करावे. आसनस्थिती घेताच शरीर शिथिल करावे. थोडा वेळ या आसनात स्थिर रहावे. जसजसा प्रत्येक अवयव शिथिल होत जाईल तसतशी शरीराला विश्रांती मिळेल आणि शरीराबरोबर मनालाही विश्रांती मिळते.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
i Benefits Of Using Cast iron Utensils Does Food Turn Black in Iron Kadhai
लोखंडी कढई किंवा बिड्याचा तवा वापरून चव व आरोग्याला काय फायदे होतात? कशी घ्यावी काळजी?

शरीर शिथिलीकरणामुळे मन शांत होते म्हणूनच ‘शशांकासनात’ राग घालविण्याचे सामर्थ्य आहे असे म्हटले जाते. ज्या लोकांना दमा असतो आणि सतत धाप लागते त्यांनी नियमित या आसनाचा सराव करावा. सुरूवातीला आसन तीस सेकंदापर्यंत टिकवावे. पण नियमित सराव आणि शिथिलीकरणामुळे हा कालावधी पाच मिनिटांपर्यंत वाढवता येतो. ‘शशांक’ म्हणजे ससा अथवा चंद्र. त्यामुळे याचे दूसरे नाव ‘चंद्रासन’ असेदेखील आहे.

हे आहेत आसनाचे इतर फायदे

१. मन चंद्रासारखे शितल होते.

२. मलावरोधही दूर होण्यास मदत होते.

३. वज्रासनाचे फायदेही मिळतात

४. गुडघेदुखी बरी होते, पोटऱ्या दुखत असतील तर त्यांना आराम मिळतो.

५. शरीराला पूर्णपणे विश्रांती मिळून क्रोध भावनांचा नाश होतो.

६. पोटातील चरबी घटते.

७. ओटीपोटातील विकार, स्त्रियांचे मासिकपाळीचे विकार दूर होतात.

८. दिसायला व करायला सोपे व सहज असलेले ‘शशांकासन’ पचनेंद्रीय सुधारते.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ.