22 November 2017

News Flash

स्थुलता आणि दम्याचा त्रास आहे? हे आसन करुन पाहा

इतरही अनेक फायदे

सुजाता गानू- टिकेकर | Updated: September 13, 2017 11:00 AM

सध्याच्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा ही समस्या वाढताना दिसते. याबरोबरच अगदी लहान वयापासूनच अनेकांना दमा झाल्याचेही आपण पाहतो. योगसाधनेत यावर उपाय असून खगासन केल्याने या समस्यांवर मात करता येते. हे विपरित शयन स्थितीतील आसन आहे. यासाठी जमिनीवर पालथे झोपून पद्मासन घालावे. दोन्ही हात कोपरात दुमडून छातीजवळ न्यावेत. हाताचे तळवे जमिनीवर स्थिर करावे. श्वास घेत छाती उचलावी व फक्त डोके उचलून मागे टाकावे. दृष्टी आकाशाकडे स्थिर करावी. जेवढा वेळ श्वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा मग हळूहळू श्वास सोडत छाती आणि डोके पूर्वस्थितीत आणावे.

अंडी चांगली राहण्यासाठी ‘हे’ करा

आसन स्थिती घेताच शरीर शिथिल करावे. या आसन स्थितीत जास्त काळ राहणे अवघड आहे. या आसनामुळे मधुमेह नियंत्रित होतो. श्वासाचे विकार बरे होतात. दम्याचा विकार ही बरा होण्यास मदत होते. दृष्टीदोष जातो. चक्कर येत असल्यास त्यावरही आराम मिळतो. छाती भरदार होते. पुरूषांसाठी हे आसन अधिक लाभदायक आहे. संभोग क्रीडेचा अधिक काळ आनंद या आसनाच्या नियमित सरावामुळे घेता येतो. स्थुलता कमी होते.  पोटातील वायू निघून जाण्यास मदत होते. या आसनात शरीराची पक्षासारखी किंवा खगासारखी स्थिती होते म्हणून याला खगासन म्हणतात. नाभी विकारही दूर होतात म्हणून प्रत्येक पुरूषाने खगासन करावे. मात्र तज्ञ योगशिक्षकाची मदत घ्यावी.

सुजाता गानू- टिकेकर

First Published on September 13, 2017 11:00 am

Web Title: yogasan useful for obesity and asthama khagasan