26 February 2021

News Flash

सॅमसंगचा १३ हजारांचा फोन मिळणार मोफत

तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही या भन्नाट ऑफरचा नक्कीच विचार करु शकता

स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. आपल्या फोनची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी कंपन्या विविध ऑफर्स जाहीर करताना दिसतात. सध्या मोबाईल ही अत्यावश्यक गरज असल्याने ग्राहकही अगदी सहज हे फोन खरेदीही करतात. सॅमसंग कंपनीने नुकतीच एक अनोखी ऑफर आणली आहे. कंपनीने नुकताच आपला एक प्युरीफायर लाँच केला असून तो खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सॅमसंगचा जवळपास १३ हजार रुपयांचा फोन मोफत मिळणार आहे. Samsung Galaxy j6 हा ३२ जीबीचा फोन पूर्णपणे मोफत मिळणार आहे असे ‘गॅजेटस नाऊ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या फोनची किंमत साधारण १२ हजार ९९० रुपये असून त्याची फिचर्सही अतिशय आकर्षक आहेत. AX5500 हा नव्याने लाँच करण्यात आलेल्या मॉडेलचा नंबर असून तो खरेदी केल्यास डबल धमाका ऑफर मिळणार आहे.

एरोडायनॅमिक टेक्नोलॉजीमुळे आसपासची जागा तत्काळ प्युरीफाय करण्याचे काम या प्युरीफायरद्वारे केले जाते असे कंपनीचे म्हणणे आहे. या प्युरीफायरची किंमत कंपनीतर्फे सांगण्यात येतयं. सॅमसंग AX5500 ची किंमत ३४,९९० रुपये असून तो ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या नव्याने आलेल्या प्युरीफायरशिवाय कंपनीचा सॅमसंग प्रिमियम एअर प्युरिफायर खरेदी केल्यास त्यावरही मोबाईल मोफत मिळणार आहे. AX5500 हा प्युरीफायर समोरुन हवेला आत खेचतो. त्यामुळे लहान धुळीचे कण, गॅस आणि त्रासदायक व्हायरस नष्ट होतात. याचा आकारही अतिशय लहान असल्याने तो घरात कुठेही अगदी सहज बसू शकतो. ३ ऑक्टोबरपासून ही ऑफर सुरु झाली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ती लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्युरीफायर खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंगच्या या मॉडेलचा नक्कीच विचार करु शकता. कारण त्यामध्ये तुम्हाला नवीन फोनही मोफत मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 1:56 pm

Web Title: you can get a smartphone worth rs 12990 free know the offer
Next Stories
1 सुजुकीने भारतात लॉन्च केल्या दोन नव्या Off Road बाइक्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
2 Suzuki Jimny चं नवं मॉडल सादर, जाणून घ्या सर्वकाही
3 भारतात नव्या आयफोनकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
Just Now!
X