चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. काळाप्रमाणे याच चॉकलेटमध्ये बरेच बदल झाले. गणपतीच्या दिवसांत बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. खरंतर हे चॉकलेट मोदक घरच्या घरीही करता येतील इतके सोपे आहेत. तर पाहूयात चॉकलेट मोदकांची सोपी आणि चटकन करता येईल अशी रेसिपी:

साहित्य :
पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)
पाव कप पिठीसाखर
दीड ते दोन चमचे कोको पावडर
कृती :
कोरडय़ा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करून घ्या. एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला. एकत्र करा. परत एकदा एक चमचा कोको पावडर घाला. मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या. तुमची स्वत:ची अशीच एखादी रेसिपी असेल तर ती देखील जरूर आम्हाला कळवा…

त्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने एका खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये तुम्ही आपल्या रेसिपी पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी सहज म्हणून ट्राय केलेली ही रेसिपी तुम्हाला बक्षीस तर मिळवून देईलच, पण ती रेसिपी अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही मदत करेल. या स्पर्धेत जिंकलेल्या भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच आठवड्याला आणखीही खास बक्षीसे मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात प्रसिद्ध असणारी, परंतु देशातल्या अन्य लोकांना अपरिचित असलेली मोदकाची आणि इतरही पाककृतीही जगभरात पोहोचवू शकणार आहात.

प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. चला तर मग या खास पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala