मोबाईलमध्ये असणारे सिमकार्ड हे केवळ फोन, मेसेज कऱण्यासाठीच नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी उपयोगी असते. या सिमकार्डमध्ये तुमची बरीच वैयक्तिक माहिती असते. आता इतक्या लहान सिमकार्डमध्ये ही वैयक्तिक माहिती कशी काय सेव्ह होते आणि मुख्य म्हणजे नेमकी यामध्ये कोणती माहिती असते याबाबत नुकतीच काही माहिती समोर आली आहे. आपल्या सिमकार्डमध्ये आपली नेमकी कोणती माहिती असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिमकार्डमध्ये मोबाईल सर्किट असते, ज्यामध्ये नेटवर्कशी निगडीत सर्व माहिती असते.

प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरकडून सिमकार्डमध्ये सेव्ह होणारी माहिती वेगवेगळी असते. याच्या सेटिंग्जमध्ये आपल्याला पूर्णपणे बदल करता येणार नसला तरीही काही प्रमाणात निश्चित बदल करता येतो. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती सिमकार्डमध्ये सेव्ह करण्यावर आपण काही प्रमाणात नियंत्रण ठेऊ शकतो. मात्र सर्व्हिस प्रोव्हायडरला आपल्याकडील नेमक्या कोणत्या माहितीची आवश्यकता आहे आणि कोणत्या माहितीची नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याबरोबरच जर आपला मोबाईल किंवा सिमकार्ड हरवले तर त्यातील कोणती माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे हे माहीत असणेही महत्त्वाचे आहे. असे काही प्रोटोकॉल आहेत जे आपल्या सिमकार्डमधील माहिती सुरक्षित ठेऊ शकतात. मात्र हे प्रोटोकॉल भंगही केले जाऊ शकतात. मात्र यातील चांगली गोष्ट ही आहे की आपल्या कार्डमधील फोटो आणि व्हिडिओ यासारखी अतिशय खासगी माहिती सेव्ह होत नाही.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
TJSB Sahakari Bank recruitment for 2024
TJSB Sahakari Bank recruitment : टीजेएसबी बँकेत ‘या’ पदासाठी भरती! माहिती पाहा

मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घराचा किंवा ऑफिसचा पत्ता, बँकेशी निगडीत माहिती आणि डॉक्टरांचे नाव आणि मोबाईल क्रमांक ठेऊ नये. सिमकार्ड चोरांच्या हातात लागल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. परंतु एसएमएस किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव आणि मोबाईल क्रमांकासोबत काही महत्त्वाची माहिती तुम्ही सेव्ह केली असेल तर ती माहिती सिमकार्डमध्ये सेव्ह होते. याशिवाय आपण मोबाईलमधून कोणताही मेसेज डिलीट केला तर तो पूर्णपणे गेला असे आपल्याला वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसते. आपण तो मेसेज पाहू शकत नाही. मात्र तो सिमकार्डच्या मेमरीमध्ये सेव्ह असतो. जोपर्यंत आपण मोबाईल डेटा ओव्हरराईट करत नाही. तोपर्यंत तो मेसेज सिमकार्डवरुन पूर्णपणे डिलीट होत नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल किंवा सिमकार्ड हरविल्यास योग्य ती काळजी घ्यायला हवी.