फेसबुक आणि व्हॉटसअॅपबरोबरच सध्या इन्साग्राम वापरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी स्टेटस अपडेट करण्यासाठी तर कधी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी या सोशल मीडिया अॅप्लिकेशनचा वापर होताना दिसतो. सध्या दिवसागणिक तंत्रज्ञानात बदल होत आहेत. त्यामुळे सगळीच अॅप्लिकेशन्स आपल्या युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोयीचा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्रामने नुकतेच एक नवीन फिचर लाँच केले असून व्हॉट्सअॅपप्रमाणे आता इंस्टाग्रामवरही तुमचे लास्ट सीन दिसणार आहे. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही सिस्टीमसाठी लवकरच हे फिचर लाँच होणार आहे.

इन्स्टाग्रामतर्फे हे नवीन अपडेट आणण्यात आले असून हे फिचर तुम्हाला न्यूज फीडमध्ये दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम मेसेजिंग सेक्शनमध्ये जावे लागेल. याआधी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर लास्ट सीन किंवा लास्ट अॅक्टिव्ह हे फिचर होते. पण आता इंस्टाग्रामनेही नव्याने हे फिचर आपल्या युजर्सना उपलब्ध करुन दिले आहे. ज्याप्रमाणे आपण व्हॉटसअॅपवर लास्ट सीन दिसू नये म्हणून सेटींग करु शकतो, त्याचप्रमाणे इथेही आपल्याला ते सेटींग करता येऊ शकेल. इंस्टाग्राममध्ये लास्ट सीन हे फिचर तुम्हाला Show Activity Status नावाने मिळेल. आपल्या इच्छेनुसार ते डी-अॅक्टीव्हेट करता येईल. पण तुम्ही जर तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस ऑफ केले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाचेही अॅक्टिव्हिटी स्टेटस दिसणार नाही.