News Flash

सरळ उभे राहिला नाहीत तर शरीराचा समतोल बिघडेल

उत्तम आरोग्याासठी आवश्यक

आपल्या जीवनशैलीतील अनेक लहान-सहान गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. दिवसभर एकाच जागी बसून राहील्याने किंवा शरीराच्या चुकीच्या ठेवणीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीराची ठेवण योग्य असल्यास आपण काही समस्या टाळू शकतो. यातही बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत महत्त्वाची असते. काही लोकांना दिर्घकाळ उभे राहून काम करावे लागते. अशावेळी तुमची उभे राहण्याची पद्धत जर चुकत असेल तर आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उभे राहण्याची कोणती पद्धत योग्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

१. शरीराची चांगली ठेवण म्हणजे तुमचे स्नायू आणि हाडे एका सरळ रेषेत असणे. म्हणजेच तुमचे महत्त्वाचे अवयव योग्य पद्धतीने कार्यरत राहतात. तुमची शरीराची ठेवण नीट असेल तर तुमची मज्जासंस्था जास्त चांगल्या पद्धतीने काम करु शकते.

२. तुमची ठेवण चांगली नसेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण कामावरही परिणाम होतो. चुकीच्या ठेवणीमुळे तुम्हाला सांधेदुखी, अपचन, श्वसनाशी निगडीत आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच दिर्घकाळ असे उभे राहील्यास तुम्ही क्षमतेपेक्षा कमी काम करता.

३. आता चुकीची ठेवण म्हणजे काय तर तुमचा चेहरा शरीरापेक्षा काही प्रमाणात पुढे आलेला असणे, सतत पाठीत पोक काढून उभे राहणे यामुळे तुमच्या माकडहाडाचा समतोल बिघडतो आणि त्याचा संपूर्ण शरीरावर चुकीचा परिणाम होतो.

ही आहेत चुकीच्या ठेवणीची लक्षणे

थकवा – तुमच्या शरीराची ठेवण योग्य नसेल तर तुम्ही लवकर थकता आणि त्यामुळे तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीने पूर्ण करु शकत नाही.

मान, पाठ, खांदे आणि पाय आखडणे – काही वेळा अचानक तुमचे पाय, पाठ आणि मान आखडल्यासारखे तुम्हाला वाटते. पण हे एकाएकी होत नाही तर तुमची बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत चुकीची असल्याने हे होते. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक पाठदुखी आणि मानदुखीच्या तक्रारी या शरीराच्या चुकीच्या ठेवणीमुळे झालेल्या असतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देऊन विशेष काळजी घ्यायला हवी.

सांधेदुखी – आपल्यातील अनेकांना अगदी कमी वयात सांधेदुखी किंवा आमवात असा त्रास होतो. हा त्रास व्यायामाचा अभाव आणि आपल्या शारीरिक ठेवणीकडे दुर्लक्ष केल्याने होतो. त्यामुळे कायमच आपली उभे राहण्याची पद्धत योग्य ठेवल्यास त्याचा फायदा होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 12:22 pm

Web Title: your standing posture must be perfect for good health
Next Stories
1 मधुमेद – एक नाकचूक
2 नियमित योगामुळे मेंदूच्या हानीस प्रतिबंध
3 मुले सतत गोड खात असतील तर ‘हे’ उपाय करुन पाहा
Just Now!
X