27 February 2021

News Flash

पायउतार झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना YouTube ने पुन्हा दिला झटका

अमेरिकेच्या सत्ताकारणात बायडन पर्व झालं सुरु

अमेरिकेच्या सत्ताकारणात बायडन पर्व सुरु झालं आहे. जो बायडन यांनी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, पण अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घातलेली बंदी सोशल मीडिया कंपन्या काही लगेचच हटवण्याची चिन्ह नाहीयेत. कारण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या युट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी अजून वाढवल्याचं जाहीर केलं आहे.

आणखी वाचा- डोनाल्ड ट्रम्प पायउतार होताच चीनने दिला झटका; २८ जणांविरुद्ध घेतला मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी अजून एका आठवड्यासाठी वाढवत असल्याचं कंपनीने मंगळवारी जाहीर केलं. जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाआधीच YouTube ने ट्रम्प यांच्यावरील ही बंदी वाढवली. ट्रम्प यांच्या चॅनलवर अजून किमान सात दिवस नवीन व्हिडिओ किंवा थेट प्रवाह अपलोड करण्यास बंदी असेल असं कंपनीने म्हटलंय. काही दिवसांपूर्वी युट्यूबने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केली होती.

आणखी वाचा- पुणेकरांचा नादच खुळा! बायडेन ‘भाऊ’ अन् ‘आक्का’ हॅरिस यांच्या अभिनंदनाचं झळकलं पोस्टर

कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत. Snapchat नेही डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन केलंय. याशिवाय स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. तर, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे. कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 10:13 am

Web Title: youtube extends ban on donald trumps channel sas 89
Next Stories
1 नोबिता आणि शिजुका अडकणार लग्नबंधनात! नेटकरी झाले भावूक
2 ऑस्ट्रेलियन जर्सीत ‘भारत माता की जय’ची घोषणा; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल
3 भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग, वॉला आनंद महिंद्रांचा टोला; म्हणाले…
Just Now!
X