लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म अ‍ॅप Youtube लवकरच एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरद्वारे युजर्स व्हिडिओमध्ये दाखवले प्रोडक्ट्स तिथूनच थेट लिंकवर क्लिक करुन खरेदी करु शकतील. याशिवाय सर्च करुनही एखादं प्रोडक्ट खरेदी करण्याचा पर्याय युजर्सना मिळेल.

YouTube च्या या नव्या फिचरची सध्या अमेरिकेच्या काही अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सवर टेस्टिंग सुरू आहे. नव्या अपडेटनंतर व्हिडिओमध्ये शॉपिंग बॅगचा आयकॉन दिसेल. कंपनीने गुगल सपोर्ट पेजद्वारे या फिचरबाबत माहिती दिली आहे.

सध्या या नव्या फिचरची टेस्टिंग सुरू आहे.  नवीन फिचरअंतर्गत युजरला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्ट्सबाबतची माहिती आणि काही शॉपिंग लिंक्स दाखवल्या जातील. म्हणजे युट्यूबवर युजर जो व्हिडिओ बघत असेल त्यामध्ये दाखवलेल्या प्रोडक्टबाबतची माहिती युजरला दाखवली जाईल. त्या प्रोडक्टसाठीची शॉपिंग लिंक व्हिडिओच्या खाली किंवा व्हिडिओवरच दिसेल. सध्या केवळ अमेरिकेच्या काही युजर्ससोबत यावर चाचणी घेतली जात आहे. म्हणजे जर ‘एखाद्या व्हिडिओचं शीर्षक Top 10 smartphones in 2020 असे असेल तर, नव्या फीचरद्वारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या फोन मॉडेल्सबाबतची सर्व माहिती व्हिडिओच्या खाली दाखवली जाईल’. यूट्यूबचं हे नवं फीचर बऱ्याच प्रमाणात ‘शॉपिंग अ‍ॅड’प्रमाणे आहे.