08 August 2020

News Flash

Zoom भारतात अजून गुंतवणूक करणार, अनेकांना नोकऱ्या मिळणार

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात, झूम ही चिनी नव्हे तर अमेरिकी कंपनी...

लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम भारतात पुढील पाच वर्षांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

झूमच्या उत्पादन व अभियांत्रिकीचे अध्यक्ष वेलचामी शंकरलिंगम यांनी एक ब्लॉग पोस्टमध्ये चीनशी संबंध नाकारण्याचा प्रयत्न करत “चीन आणि झूमबद्दल जे गैरसमज सध्या पसरत आहेत ते निराशाजनक आहेत” असं म्हटलं आहे. “आमची भारतीय बाजारावर पकड निर्माण होत असतानाच झूमबाबत काही गोष्टींबद्दल गोंधळ उडाला आहे. आम्हाला यातून बाहेर यायचं आहे”, असं सांगत झूम ही अमेरिकी कंपनी असल्याचं शंकरलिंगम यांनी म्हटलंय.

“भारत आधीपण महत्त्वाचं मार्केट होतं आणि यापुढेही आमच्यासाठी ते महत्त्वाचं मार्केट असेल. पुढील पाच वर्षांमध्ये भारतात महत्त्वाची गुंतवणूक करण्याची आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आहे” असं  शंकरलिंगम यांनी सांगितलं.  दरम्यान, भारताने ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर झूम अ‍ॅपवरही बंदीची मागणी होत होती. त्यावर झूम ही अमेरिकी कंपनी असल्याचं सांगत शंकरलिंगम यांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने जिओमिट हे नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप लाँच केल्यानंतर आता झूमला भारतीय बाजारात चांगलीच टक्कर मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:55 pm

Web Title: zoom says they planning significant investment and more hiring in india sas 89
Next Stories
1 JioFiber युजर्ससाठी खास प्लॅन, फ्री मिळणार Lionsgate Play चा अ‍ॅक्सेस
2 2000 रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा फोन, फक्त पाच दिवसांसाठी ऑफर
3 कपड्यांच्या आतमध्ये फिट होतो Sony चा नवा AC, गरमीपासून मिळेल दिलासा
Just Now!
X