आपला चेहरा तजेलदार आणि नितळ असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यामुळे अनेक वेळा महिला त्यांच्या चेहऱ्याची विशेष काळजी घेताना दिसतात. यात अनेकदा महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र, सतत सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरात सहज उपलब्ध होतील अशा घरगुती पदार्थांचा वापर करणं कधीही फायदेशीर आहे. यामध्येच खोबऱ्याचं तेल हे चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे खोबरेल तेलाचा वापर करुन आपण सौंदर्य कसं वाढवू शकतो ते जाणून घेऊयात.

१. डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात.

Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Are you getting enough sleep at night 5 habits that are slowing down your
तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

२.खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

३.खोबरेल तेलात कोअर्स शुगर (coarse sugar, या साखरेचे दाणे आकाराने थोडे मोठे असतात) मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

४. मेकअप रिमूव्हर – कदाचित अनेक महिलांना माहिती नसेल पण खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. मेकअप काढण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारात मिळणारे वेगवेगळे रसायनयुक्त रिमूव्हर विकत घेतो. पण त्याऐवजी खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.

५.खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.

६.खोबरेल तेल कोणत्याही प्रकाराच्या त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.

७.खोबरेल तेलाने जखमेवरील दाह कमी होतो. जर तुम्हाला चटका लागला तर भाजलेल्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे. होणारा दाह लवकर कमी होतो.

८. चेहऱ्यावर पुरळ येत असलीत तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.

९.सतत आपण केसांवर केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनरचा मारा करत असतो. यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसगळतीचे प्रमाण वाढते. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करत असाल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते.

१०. जर अंगावर लाल चट्टे किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेलाच्या वापरामुळे आराम मिळतो.