घरात डासांच्या वाढत्या आक्रमणामुळे संध्याकाळी अंगणात बसून आनंद घेणं आणि वारा येण्यासाठी दारे, खिडक्या उघड्या ठेवणे अशक्य होते. डासांच्या समस्यांनी अनेक कुटुंब हैराण झालेली असतात. या डासांचा सामना करणे खूपच त्रासदायक ठरते. विशेषत: डासांच्या सतत कानाभोवती घुणघुणण्यामुळे खूप चिडचिड होतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे जीवघेणे आजार बळावण्याचं प्रमाणही वाढलं आहे. म्हणून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य संरक्षणासाठी त्यांना डासांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.

घरात शिरकाव करणाऱ्या डासांपासून मुक्ती कशी मिळवाल?

काही घरगुती उपाय करून तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता. हे घरगुती उपाय कोणते जाणून घेऊ…

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

१) लसूण

लसणाच्या तीव्र वासामुळे डासांना दूर ठेवण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्याव्या लागतील, मग त्या गरम पाण्यात थोड्या उकळवा आणि ते पाणी एका बाटलीत भरून घरभर स्प्रे करा. यामुळे घरातून डास पळून जातील.

२) तुळस

तुळशीच्या पानांचा नैसर्गिक सुगंध डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. तुमच्या दारात किंवा खिडकीत तुळशीच एकतरी रोप तरी लावा. कारण तुळस ही औषधी वनस्पती असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यास मदत करते, तसेच डास चावल्यानंतर अंगावर येणाऱ्या मोठ्या फोड्यावर तुळशीची पानं चोळणे फायदेशीर ठरते.

३) लवंग आणि लिंबू

लवंग आणि लिंबू हा देखील डासांना दूर ठेवण्याचा एक उत्तम उपाय आहे. काही लिंबांचे अर्धे तुकडे करा आणि त्या प्रत्येक तुकड्यात एक लवंग चिकटवून ठेवा. ज्याठिकाणी डास जास्त येतात त्याठिकाणी हे लवंग टाकलेले लिंबूचे तुकडे ठेवा, यामुळे घराभोवतच्या डासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.

४)कडुलिंब आणि लॅव्हेंडर तेल

थोडे कडुलिंब आणि लॅव्हेंडर तेल १:१ या प्रमाणात मिक्स करून ते त्वचेवर लावा. यामुळे डास तुम्हाला सहसा चावणार नाहीत. घरात लावता त्या कमर्शियल कॉइलपेक्षा कडुलिंबाचे तेल डासांना चांगल्याप्रकारे आपल्यापासून दूर ठेवतात. कडुलिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहे ज्यामुळे आपली त्वचा डासांपासून सुरक्षित राहते.

५) पेपरमिंट ऑइल

एक कप पाण्यात पेपरमिंट ऑइलचे काही थेंब टाका आणि स्प्रे कॅनमध्ये भरा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर स्प्रे करा. पेपरमिंट ऑइलमध्ये रासायनिक संयुगे असतात जे डासांना दूर ठेवू शकतात, यामुळे अंगाला पुदिन्याच्या येणाऱ्या वासामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

६) कापूर तेल

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर तेल हा सर्वात चांगला उपाय आहे. घराचा दरवाजा आतून बंद करा आणि घरात कापरचा जाळून धूर करा, कपूर असेच २० मिनिटे राहू द्या. कापराच्या वासामुळे तुमच्या घरात डासांविरोधात एक सुरक्षा कवच तयार होईल. काही वेळाने तुम्ही जमिनीवर मेलेले डास दिसतील.

७) कॉफी

जर तुमच्या घराबाहेर साचलेल्या पाण्याचे डबके असेल तर तिथे डासांचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा छतावर पाण्याचे डबके असतील तर सर्वत्र काही कॉफी पावडर टाका. यामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांनी घातलेली अंडी आपोआप पाण्यावर तरंगतील, या अंड्यांना योग्य ऑक्सिजन न मिळाल्याने ती मरून जातील, अशाप्रकारे तुम्ही डासांना घरात शिरण्यापासून रोखू शकता.

८) डासांना दूर ठेवणारे वनस्पती

फिवरफ्यू,, सिट्रोनेला आणि कॅटनिपसारख्या काही वनस्पती डासांना दूर ठेवण्यासाठी ओळखल्या जातात. तुम्ही या वनस्पती तुमच्या बागेत लावू शकता, तसेच घराच्या खिडकीजवळ किंवा दारापाशी ठेवू शकता, या वनस्पतींमुळे डास तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत

९) टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलचे काही थेंब काही पाण्यात मिसळा आणि त्वचेवर लावा. हे अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल ऑइल असल्यामुळे ते डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करतात, शिवाय डास चावल्यावरही ही तेल औषध म्हणून लावू शकता.

१०) रोझमेरी

रोझमेरीचे देठ डासांना दूर ठेवण्यासाठी उत्तम आहे. घराच्या आत रोझमेरीचे फक्त काही देठ जाळून ठेवा. यामुळे तुम्ही घरातील डासांपासून प्रभावीपणे मुक्त मिळू शकते.

डासांमुळे अनेक आजार तर होतातच पण त्यांच्या घरातील वावरामुळे मोठी अडचणी निर्माण होते, त्यामुळे वरील दहा घरगुती उपाय करून तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता.