scorecardresearch

१२ आठवड्यांत कमी होऊ शकते ६ किलो वजन, केवळ ‘हे’ नियम पाळावे लागतील

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार कोणतीही व्यक्ती १२ आठवड्यांमध्ये जवळपास ६ किलो वजन कमी करू शकतो. पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी सुधाराव्या लागतील.

१२ आठवड्यांत कमी होऊ शकते ६ किलो वजन, केवळ ‘हे’ नियम पाळावे लागतील
वजन कमी करण्यासाठी खा 'हे' फळ ( फोटो : freepik )

वजन वाढणे ही सर्वात मोठी समस्या असून ती इतर आजारांना देखील आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे, वजन कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. रोज व्यायाम आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. दरम्यान वाढलेले वजन काही दिवसांतच कमी होत नाही. यासाठी नियमित व्यायाम आणि प्रयत्न सुरू ठेवावे लागतात, असे सांगितल्या जाते. मात्र, नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार कोणतीही व्यक्ती १२ आठवड्यांमध्ये जवळपास ६ किलो वजन कमी करू शकते. पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी सुधाराव्या लागतील.

लवकर वजन कमी करण्याचे १० टिप्स

१. सकाळी नाश्ता करा. तज्ज्ञांनुसार सकाळी नाश्ता न केल्यास तुम्हाला दिवसभर भूक लागू शकते. नाश्ता केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात जे भूक नियंत्रणास ठेवण्यास मदत करू शकतात.

२. डॉक्टराच्या अनुसार, दिवसभरात नियमित खालल्यास कॅलरीज लवकर बर्न होतात आणि भूकही कमी लागले. अधिक काळ उपाशी राहिल्यास भूक अधिक लागते आणि मग अधिक खालले जाते. याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदा अधिक खाण्याऐवजी नियमित अंतराने खा.

(चेहऱ्याप्रमाणे मानही उजळेल, काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय)

३. आहारामध्ये भरपूर फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. फळ आणि भाज्यांमध्ये कॅलरी, फॅट आणि कार्ब कमी असते. नॅशनल हेल्थ सर्विसनुसार वजन कमी करण्यासाठी फळे आणी भाज्यांचे भरपूर सेवन केले पाहिजे.

४. नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहा. भरपूर पायदळ चाला, लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. शारीरिक श्रम अधिक करा.

५. नॅशनल हेल्थ सर्विसच्या आनुसार, अनेकदा लोक तहान आल्यास त्यास भूक लागल्याचे समजतात आणि भरपूर खातात. या ऐवजी भूक लागल्यास आधी पाणी प्या आणि त्यानंतरही भूक गेली नाही तर काही पौष्टिक खा. याने अतिरिक्त कॅलरी शरीरात जाणार नाही.

६. मोठ्या थाळी ऐवजी छोट्या थाळीत खा. मोठ्या ऐवजी छोट्या थाळीत खालल्यास भूक लवकर जाते आणि ती कमी करण्यास देखील मदत होते. त्यामुळे नेहमी छोट्या थाळीत खावे. मेंदूला २० मिनिटांनंतर पोट भरल्याचे कळते. त्यामुळे हळू हळू खा आणि पोट भरल्याचे वाटल्यावर खाणे बंद करा.

७. जंक फूड खाणे टाळा. जंक फूड खालल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. जंक फूड खाण्याची इच्छा टाळण्यासाठी ते विकत घेऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करा.

(या सेलिब्रिटींना जीममध्ये आला होता हृदयविकाराचा झटका, तुम्ही व्हा सावध, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी)

८. आधिक मद्य पिल्याने वजन वाढते. मद्य न पिल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जाणार नाही.

९. आवडती वस्तू खा. पण नेहमी खाण्याचाच विचार करू नका अन्यथा तुम्हाला अधिक भूक लागेल. तसेच कॅलरी, विटामिन आणि मिनरल आदी गोष्टी लक्षात ठेवून खावे.

१०. वजन कमी करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. असे पदार्थ वजन कमी करण्यात मदत करतात. डाळ, सुका मेवा, फळ आणि भाज्या खा. फायबर असलेले पदार्थ खालल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते. याने अतिरिक्त खाणे कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.