How to sharp your mind: प्रत्येकाला आपला मेंदू संगणकाच्या वेगाने काम करावा असे वाटते. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. खरे तर अमेरिकेतील डॉ. हॉवर्ड टकर यांनी अलीकडेच आपले मन तल्लख ठेवण्यासाठी तीन आश्चर्यकारक नियम सांगितले आहेत. डॉ. हॉवर्ड १०१ वर्षांचे आहेत आणि २०२१ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांना ‘सर्वात वयस्कर वैद्यकीय डॉक्टर’ या उपाधीने सन्मानित केले आहे.

एका माध्यम संस्थेशी बोलताना डॉ. हॉवर्ड टकर यांनी स्पष्ट केले की, या वयातही ते दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रुग्णांना सल्ला आणि उपचार देतात. इतकेच नव्हे तर वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी ओहायो बार परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर कायद्याच्या शाळेत प्रवेश घेतला. आजही ते संशोधन करत आहेत, विशेषतः मज्जासंस्थाशास्त्राच्या क्षेत्रात. या वयातही ते आपली बुद्धी इतकी तल्लख कशी ठेवतात, असा प्रश्न त्यांना अनेकदा पडतो. आता डॉ. हॉवर्ड यांनी अखेर हे रहस्य उघड केले आहे.

डॉक्टरांच्या मते, “असे काही व्यायाम आहेत जे आपल्या मेंदूच्या विकासासाठी खूप मदत करू शकतात. १०१ वर्षांच्या वयातही मी माझे मन तीक्ष्ण ठेवण्यासाठी तीन नियम पाळतो, जे कोणीही अवलंबू शकते.” चला जाणून घेऊया हे तीन नियम कोणते आहेत.

Award Banner

१०१ वर्षांच्या डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ ३ नियम लक्षात ठेवा

नियम क्र. १ – स्वतःला व्यस्त ठेवा

सीएनबीसीशी बोलताना डॉ. हॉवर्ड म्हणाले, “मला नेहमी व्यस्त राहायला आवडते आणि ते माझ्या कामासाठी आवश्यक आहे. न्यूरोलॉजीमध्ये दररोज नवनवीन गोष्टी समोर येतात, त्यामुळे त्यांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या मेंदूने अधिक वेगाने काम करावे असे वाटत असेल, तर स्वतःला कोणत्यातरी गोष्टीत व्यस्त ठेवणे हा पहिला नियम आहे.”

नियम क्रमांक २ : तुमच्या सामाजिक जीवनावर लक्ष केंद्रित करा.

डॉ. हॉवर्ड यांनी स्पष्ट केले की, “अनेक अभ्यासांमधून हे दिसून आले आहे की, घट्ट सामाजिक संबंध आपली स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. ज्या लोकांचे सामाजिक संबंध घट्ट असतात ते अधिक काळ आणि निरोगी आयुष्य जगतात, म्हणूनच मी आजही आठवड्यातून किमान दोनदा माझ्या मुलीसोबत, तिच्या पतीसोबत किंवा माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत जेवायला बाहेर जातो. तसेच मी मित्र आणि सहकाऱ्यांसोबत नवीन रेस्टॉरंटमध्येही जेवायला जातो, यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.”

नियम क्र. ३ : मनोरंजनही महत्त्वाचे आहे

तिसऱ्या नियमात डॉ. हॉवर्ड स्पष्ट करतात की, मनोरंजनदेखील मन तल्लख ठेवण्यास मदत करू शकते. ते म्हणाले, “जेव्हा मी न्यूरोलॉजीमधील नवीनतम प्रगती आणि उपचारांबद्दल वाचत नसतो, तेव्हा मला चरित्रे आणि रहस्यमय कादंबऱ्या वाचायला आवडतात. माझा विश्वास आहे की मन तल्लख ठेवण्याची हीच गुरुकिल्ली आहे. चांगली पुस्तके वाचल्याने तुमचा मेंदू तरुण राहतो.” डॉ. हॉवर्ड यांचा विश्वास आहे की, निवृत्ती ही दीर्घायुष्याची शत्रू आहे.