Premium

थंडीच्या ४ महिन्यात पालकाचे सेवन केल्यास शरीरात काय बदल होऊ शकतात? डॉक्टरांनी सांगितलं गणित

Eating Spinach: तुम्ही पालकाला तुमच्या आहारात रोजचा मुख्य भाग बनवता तेव्हा शरीरावर त्याचा कसा प्रभाव होऊ शकतो हे माहितेय का? विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये दररोज पालक खाल्ल्याने..

120 days If You Eat Palak In Winter How Your Body Will Change Benefits Of Spinach How Much Palak Should You Eat Body Maths
थंडीच्या ४ महिन्यात पालकाचे सेवन करण्याचे फायदे व तोटे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

If You Eat Spinach Everyday In Winter: सुपरफूड्सच्या यादीमध्ये पालकाच्या पानांइतके पौष्टिक सत्व आणि अष्टपैलुत्व फार कमी भाज्यांमध्ये आहे. चमकदार रंग आणि समृद्ध चव यासाठी ओळखल्या जाणार्‍या हिरव्या पालक या पालेभाजीने आहारातील पॉवरहाऊस म्हणून आपले स्थान कमावले आहे. पण जेव्हा तुम्ही पालकाला तुमच्या आहारात रोजचा मुख्य भाग बनवता तेव्हा शरीरावर त्याचा कसा प्रभाव होऊ शकतो हे माहितेय का? विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये दररोज पालक खाल्ल्याने तुमच्या शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात, याविषयी तज्ज्ञांच्या मदतीने आज आपण सविस्तर जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम.ए. मुकसिथ कादरी, सल्लागार, जनरल मेडिसिन, केअर हॉस्पिटल, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “पालक ही एक समृद्ध पालेभाजी आहे ज्यात जीवनसत्त्वे जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, लोह आणि कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पालकाचे नियमित सेवन केल्याने संपूर्ण आरोग्याला मदत होतेच पण विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती वाढून ऊर्जा राखण्यास याचा जास्त फायदा होतो.

हिवाळ्यात पालक रोज खाण्याचे काय फायदे आहेत? (Benefits Of Eating Spinach)

अँटिऑक्सिडंट गुणधर्म: पालकामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात, व जुनाट आजारांचा धोका कमी करतात.

हृदयाचे आरोग्य: पालकमधील फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी अडथळ्यांना दूर करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकतात.

हाडांचे आरोग्य: पालक हा व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, यामुळे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी याची मदत होते.

वजनावर नियंत्रण: पालकमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पालकाचे सेवन केल्यास पोट भरल्यासारखे भासते व अवेळी भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.

पालक रोज खाण्यात काही धोका आहे का? (Risk Of Eating Spinach)

पालक हे सामान्यतः आरोग्यदायी अन्न असले तरी काही बाबी आहेत ज्या चिंताजनक ठरू शकतात असे डॉ. कादरी यांनी स्पष्ट केले, जसे की..

ऑक्सॅलेट्स: पालकाचा भाजीमध्ये ऑक्सॅलेट्स असतात, जे कॅल्शियम सारख्या खनिजांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात आणि अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये किडनी स्टोन तयार करण्यास हातभार लावू शकतात. जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तुम्ही पालकाचे सेवन कमी करू शकता.

थायरॉईड समस्या: पालकमध्ये गॉइट्रोजेन्सचे प्रमाण जास्त असते, थायरॉईड समस्या असलेल्या लोकांना, विशेषत: हायपोथायरॉईडीझम असल्यास कच्च्या पालकाचे सेवन कमी करावे.

औषधोपचार सुरु असल्यास: जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल किंवा विशिष्ट औषधांसह पालकातील पोषक तत्व एकत्रित न घेण्याचा सल्ला तुम्हाला दिला असेल तर सेवन टाळावे, अन्यथा तुमचा वैद्यकीय इतिहास ठाऊक असणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधावा.

हे ही वाचा<< मिठाचा ‘हा’ उपाय डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास कसा करतो कमी? तज्ज्ञांनी सांगितली, सेवनाची योग्य पद्धत व प्रमाण

कोणत्याही अन्नाप्रमाणेच, पालक खाताना सुद्धा संयम महत्त्वाचा आहे. तुम्हाला विशिष्ट आरोग्यविषयक चिंता किंवा परिस्थिती असल्यास, वैयक्तिक सल्ल्यासाठी नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही उत्तम.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 120 days if you eat palak in winter how your body will change benefits of spinach how much palak should you eat body maths svs

First published on: 07-12-2023 at 12:43 IST
Next Story
२ रुपयांचा ‘हा’ उपाय मातीला करेल बुरशी मुक्त; वेगाने होईल तुळस व भाज्यांच्या रोपांची वाढ, पाहा Video