साहित्य :
बासमती तांदूळ- २ वाटी
पालक – १ जुडी
जिरे – १ टीस्पून
गरम मसाला – १ टीस्पून
हळद – १/२ टीस्पून
लाल तिखट – १/२ टीस्पून
तेल, मीठ (चवीनुसार) कोथिंबीर लसूण आवडत असेल तर थोडी कुटूण घेणे. (३/४ पाकळ्या.)

कृती-
तांदळाचा मोकळा भात करणे. पालकची पाने उकडून गार करून पेस्ट करणे. तेलात जिरे घालून, हळद, भात, पालक पेस्ट, गरम मसाला सर्व एकत्र करणे व परतणे त्यात लसून कुटून घालणे. मीठ, लाल तिखट घालून परत एकदा परतणे. मग कोथिंबीर घालून सर्व करणे.

वेज पुलाव

साहित्य –
तांदूळ- २ वाटी
मटार – १/२ वाटी
बीन्स – १/२ वाटी
गाजर – १/२ वाटी
फूलकोबी (फ्लॉवर) १/२ वाटी
तुकडे केलेले असावे.

मसाला साहित्य –
४/५ वेलची (छोटी),
२ तेजपत्रे,
२ मोठी वेलची,
४/५ लवंगा,
आलं,
लसूणची पेस्ट थोडी,
कोथिंबीर व पुदिनाची पाने सजावटीसाठी.
मीठ व तूप (थोडी साखर चवीसाठी)

कृती –
सर्व भाज्या लांब कापून घ्या. भात शिजवून मोकळा करावा. तुपात सर्व मसाले (लवंग, वेलची, तेजपत्ता टाका) त्यानंतर आलं, लसूण पेस्ट घालून परता. मग सर्व भाज्या शिजवून घ्या. नंतर मोकळा केलेला भात घालून परता. मीठ व साखर घाला झाकण ठेवा. थोडा परता, मग कोथिंबीर व पुदिना पाने घालून सव्‍‌र्ह करा.

टोमॅटो राइस

साहित्य –
४/५ लाल मिरचीचे तुकडे
२ टीस्पून धने
१ टीस्पून चणा डाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
मेथी दाणे (एकदम थोडेसे)
१टीस्पून सुके खोबरे (किसलेले)
(हे सर्व साहित्य थोडय़ा तेलात परतून घेणे.) (मग मिक्सरमध्ये वाटून घेणे.)
३/४ टोमॅटोचा पल्प
१/२ टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून सरसो (राई)
२ टेबलस्पून दाणे (शेंगदाणे)
६/७ कढीपत्ता
२ टीस्पून हिरवी मिरची
१ छोटा कांदा बारीक कापलेला
२ वाटी शिजवलेला भात.
(तूप व तेल, मीठ, साखर)

कृती –
टोमॅटो पल्प, हळद, मीठ, २ टीस्पून तेलात परतणे, त्यात ग्राइंड केलेला मसाला परतणे. मग कढईत तूप टाकून सरसो (राई) टाकणे. मग कढीपत्ता शेंगदाणे घालून परतणे. कांदा, हिरवी मिरची घालून पुन्हा परतणे. मग टोमॅटो पल्पचे मिश्रण, भात सर्व एकत्र करून ५/६ मिनिट परतणे. थोडी साखर घालून पुन्हा एकदा परतणे व गरम गरम सर्व करणे.
सुरेखा भिडे – response.lokprabha@expressindia.com