scorecardresearch

VIDEO: तर्री पोहे ते कोंकणी पोहे; १५ ते १६ प्रकारच्या पोह्यांचा आनंद घ्या एकाच छताखाली

पुण्यातील एका ठिकाणी सुमारे १५ हून अधिक प्रकारचे पोहे मिळतात.

पुणेकर आपल्या जिभेचे चोचले अगदी खुबीने पुरवतात. बसायला सोय नसेल पण पदार्थ चविष्ट असेल तर ते उभं राहून खाणे देखील पसंत करतात, आणि अलीकडच्या काळात तर खाद्य संस्कृती खूप बदलली आहे, पण तरीही झटपट बनणारे आणि चविष्ट लागणारे पोहे जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतात. पुण्यातील एका ठिकाणी सुमारे १५ हून अधिक प्रकारचे पोहे मिळतात.

प्रांतीय पद्धत जपत थोडे काळानुरूप बदल करत नवे चिझी असे पोह्यापासून बनवलेल्या डिशेस देखील इथे चाखायला मिळतात. अगदी वाजवी दरात पुणेकर इथे पोटभर नाश्ता करू शकतात. संपूर्ण महाराष्ट्रात ‘आम्ही पोहेकार’च्या एकूण २४ शाखा आहेत.

वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाणारे पोहे एकाच ठिकाणी पुणेकरांना मिळतात. ‘आम्ही पोहेकार’ अगदी कमी वेळात पुणेकरांच्या पसंतीचे ठिकाण झालं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16 varieties of poha at aamhi pohekar in pune hrc