आज १ नोव्हेंबरपासून एलपीजी बुकिंग, ट्रेनच्या वेळापत्रकासह अन्य गोष्टींच्या नियमामध्ये होणार बदल

आज १ नोव्हेंबर २०२१ पासून देशातील अनेक सुविधांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल.

1st November Rules Change 2021
१ नोव्हेंबर २०२१ पासून बदलले नियम (प्रातिनिधिक फोटो)

आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२१ पासून देशात अनेक नियम बदलत आहेत आणि अनेक बदल लागू केले जात आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडर बुक करण्याच्या नवीन पद्धतीचाही समावेश आहे. दुसरीकडे बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला असून कर्ज घेण्यावर सेवा शुल्क लागू केले आहे. सोमवार, १ नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्व वर्गांच्या शाळा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सरकारी बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे.जर ग्राहकाने कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन किंवा ऑनलाइन कर्ज घेतले असेल किंवा ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळा ठेवी आणि पैसे काढले असतील तर त्याला १५० रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. बँकेने पैसे काढणे आणि ठेवीवर १५० रुपये सेवा शुल्क आकारले आहे. १ नोव्हेंबरपासून रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. यामुळे सर्व गाड्यांच्या आगमन आणि सुटण्याच्या वेळेतही बदल होईल.

बँक ऑफ बडोदाची सेवा महागली

बँक ऑफ बडोदाची सेवा महागणार आहे. बँक ऑफ बडोदामधून तीनदा पैसे काढणे विनामूल्य असेल, परंतु त्यानंतर १५० रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. हे शुल्कही कर्जासाठी भरावे लागणार आहे. तर तीनपेक्षा जास्त वेळा पैसे जमा केल्यास ४० रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, जन धन खात्यांवर असे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पेन्शनधारकांना सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या बँकेशी संबंधित पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ते ही प्रक्रिया व्हिडीओ कॉलद्वारे पूर्ण करू शकतील.

रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल

रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वाहतुकीच्या वेळेत बदल होणार आहेत, कारण १ नोव्हेंबरपासून रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. पॅसेंजर गाड्यांव्यतिरिक्त मालगाड्या आणि काही राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रकही बदलत आहे.

एलपीजीसाठी ओटीपी बुकिंग

सरकारने एलपीजीसाठी (एलपीजी बुकिंग ओटीपी) व्हॉट्सअॅप आणि ओटीपी आधारित बुकिंग सेवाही सुरू केली आहे. यामध्ये एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकाच्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. सिलिंडर घेताना हा ओटीपी ग्राहकाला त्याच्या गॅस एजन्सीच्या एजंटसोबत शेअर करावा लागेल. स्वयंपाकाच्या गॅसचे ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकार दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किंमतीचाही आढावा घेते. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही वाढू शकते.

एलपीजी दरवाढ

महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवतात. गेल्या आठवड्यातच बातमी आली होती की या आठवड्यात स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आणखी महाग होऊ शकतात, अशा परिस्थितीत गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढू शकतात.

जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही

व्हॉट्सअॅप सेवा काही स्मार्टफोनमध्ये काम करणार नाहीत. व्हॉट्सअॅपने आधीच माहिती दिली आहे की १ नोव्हेंबरपासून त्याच्या सेवा अनेक जुन्या आवृत्तीच्या अँड्रॉइड फोनमध्ये काम करणार नाहीत. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, त्याची सेवा Android 4.0.3, सँडविच आणि KaiOS आवृत्तीवर काम करणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1st november rules change 2021 railways changed the timetable of trains booking of lpg through otp know the big changes of november ttg

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या