scorecardresearch

Premium

२ कापूराच्या गोळ्यांचा ‘हा’ उपाय थंडीत तुमच्या टाचांना देईल आराम; भेगा होतील दूर, टाच राहील मऊ, पाहा Video

Cracked Heels Remedies Video: टाचांवर वेळीच उपाय न केल्यास त्यात भेगा पडून मग हळूहळू धूळ- माती अडकू लागते. काही वेळा तर पायात ठणका भरण्याचं सुद्धा हेच निमित्त ठरू शकतं.

2 Camphor Kapur Balls With Coconut Oil Solution For Cracked Heels In Winter Home Remedies Watch Video Making Moisturizer
भेगा पडलेल्या टाचेला लावण्याची क्रीम कशी बनवायची? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Cracked Heels In Winter Home Remedies: डिसेंबर म्हणताच छान गुलाबी थंडीतील निवांतपणा, धमाकेदार वर्षपूर्तीच्या पार्ट्या एकूणच मौजमजा असं एक दृश्य डोळ्यासमोर येतं. पण मजा करायची असेल तर मूड सांभाळणं खूप गरजेचं असतं. आजवर कित्येक अभ्यासकांनी सुद्धा हे सांगितलं आहे की तुमची स्वच्छता ही तुमच्या मूडशी खूप जवळून जोडलेली असते. काही वेळा तुम्ही कितीही स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगला तरी काही गोष्टी वातावरणावरच अवलंबून असतात. जसे की पायाच्या फुटलेल्या टाचा. थंडीच्या दिवसांमध्ये गार हवेमुळे त्वचा रुक्ष पडते. त्यात पायाच्या टाचा या अगोदरच शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत टणक असतात परिणामी त्यांच्यावर रुक्षपणाचा जास्त प्रभाव होतो. या टाचांवर वेळीच उपाय न केल्यास त्यात भेगा पडून मग हळूहळू धूळ- माती अडकू लागते. काही वेळा तर पायात ठणका भरण्याचं सुद्धा हेच निमित्त ठरू शकतं. या सगळ्यावर उपाय काय तर टाचांची काळजी घेणे. आज आपण त्यासाठीच एक सोपी घरगुती पद्धत पाहणार आहोत.

इन्स्टाग्रामवर @theglobalistagirl या अकाउंटवर भेगा पडलेल्या टाचांना मऊ करण्यासाठी घरगुती क्रीम कशी बनवायची याचा एक सोपा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला फार कष्ट व खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी मोजक्या सामानात ही क्रीम कशी बनवायची पाहूया.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…

आवश्यक वस्तू
१) मोहरीचं तेल
२) खोबरेल तेल
३) कापूर
४) पेट्रोलियम जेली (व्हॅसलिन)
५) व्हिटॅमिन ई कॅप्सूल

भेगा पडलेल्या टाचेला लावण्याची क्रीम कशी बनवायची?

सर्वात आधी एका वाटीत २ टेबलस्पून मोहरीचं तेल, २ टेबलस्पून खोबरेल तेल, अर्धा टेबल स्पून कापूर, थोडी पेट्रोलियम जेली आणि व्हिटॅमिन कॅप्सूल (फोडून) मिसळून घ्या. मग आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने हे मिश्रण थोडं कोमट करायचं आहे.

डबल बॉयलरसाठी आपण गॅसवर एका भांड्यात पाणी उकळवून त्या पाण्यात ही वाटी पाणी मिसळणार नाही अशा उंचीवर ठेवायची आहे. तेल थोडं कोमट झालं की एका डब्यात काढून घ्या आणि मग ३० मिनिटांशी फ्रीजमध्ये ठेवा.

ही क्रीम आपल्याला रोज रात्री झोपताना पायाला लावता येऊ शकते. एकदा क्रीम पायात पूर्णपणे मुरली की मग आपण मोजे घालू शकता जेणेकरून मॉइश्चर टिकून राहील.

हे ही वाचा<< कानाच्या पाळीवरील ‘ही’ खूण असते हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकाराचं चिन्ह? हृदयरोग तज्ज्ञांनी दिली स्पष्ट माहिती

दरम्यान, थंडीत टाचांची जास्त काळजी घेणं आवश्यक असतं जर तुम्ही वारंवार पाण्यात काम करत असाल तर साधी चप्पल वापरू शकता, तसेच शक्य असेल तेव्हा मोजे घातल्यास सुद्धा टाचांची त्वचा मऊ राहू शकते. तुम्ही सुद्धा ही टीप वापरून पाहा आणि त्याचा कसा फायदा होतो हे कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 camphor kapur balls with coconut oil solution for cracked heels in winter home remedies watch video making moisturizer svs

First published on: 09-12-2023 at 14:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×