बजाजची Pulsar 150 Neon लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

बजाजने गुरूवारी भारतात नवी Pulsar 150 Neon लाँच केली आहे

बजाजने गुरूवारी भारतात नवी Pulsar 150 Neon लाँच केली आहे. नवी पल्सर 150 निऑन ही मुळतः पल्सर 150 क्लासिकच आहे, पण नव्या रंगांच्या पर्यायांत ही बाइक बाजारपेठेत उतरवण्यात आली आहे. ही बाइक निऑन रेड, निऑन येलो आणि निऑन सिल्व्हर या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

नवी बाइक दिसायला शानदार आहे. या बाइकमध्ये हेडलँप आयब्रो, बॅज, साइड पॅनल, ग्रॅब रेल, थ्रीडी लोगो आणि अॅलॉय व्हिल्सवर निऑन हायलाइट्स आहे. बजाज पल्सर 150 निऑनमध्ये 149सीसीचं एअर कूल, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. या बाइकमध्ये 5 स्पीड युनिटचा गिअरबॉक्स आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 240 एमएमचा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 130 एमएमचा ड्रम ब्रेक देण्यात आलाय. कंपनीने या बाइकमध्ये एबीएस दिलेला नाही. दिल्लीमध्ये या बाइकची एक्स शोरूम किंमत 64 हजार 998 रुपये इतकी आहे. तर मुंबईत 65 हजार 446 रुपये आहे. पुण्यातही इतकीच किंमत असून बेंगळुरूत 66 हजार 086 रुपये, कोलकात्यात 66 हजार 240 रुपये आणि चेन्नईत या बाइकची किंमत 66 हजार 790 रुपये इतकी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2019 bajaj pulsar 150 neon launched

ताज्या बातम्या