2022 Rashifal: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी २०२२ वर्ष असणार आहे खास, नोकरीत प्रचंड यश मिळण्याची शक्यता

काहींसाठी हे वर्ष खास असणार आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या आयुष्याबद्दल बरेच काही शोधू शकतो असं मानलं जातं.

Numerology
अंकशास्त्र (प्रातिनिधिक फोटो )

Numerology 2022 Horoscope: अंकशास्त्रानुसार, आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या आयुष्याबद्दल बरेच काही शोधू शकतो असं मानलं जातं. २०२२ बद्दल बोलायचे झाले तर, अनेक जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे. २०२२ च्या एकूण गुणांची बेरीज सहा असेल. अंक सहा हा शुक्र ग्रहाचा अंक मानला जातो. जी चांगली संख्या आहे. ज्या लोकांचा मूलांक सहा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप महत्वाचे असेल. याशिवाय २०२२ मध्ये दोन हा अंक तीनदा येत असल्याने रॅडिक्स दोन च्या लोकांसाठी नवीन वर्ष खास असेल.

मूलांक एक

ज्या लोकांची जन्मतारीख १, १०, १९ किंवा २८ आहे त्यांचा मूलांक क्रमांक १ असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. विशेषतः नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात चढ-उतार असतील, परंतु व्यवसायाला पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या वर्षी तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. वर्षाचा मध्य तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. या वर्षी तुम्ही चांगला बँक बॅलन्स तयार करू शकाल.

मूलांक दोन

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक दोन असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले ठरणार आहे. नोकरीत अनेक संधी मिळतील. प्रत्येक आव्हानाला तोंड देत तुम्ही पुढे जात राहाल. या वर्षी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नक्कीच अडचणी येतील, परंतु तुम्ही समजूतदारपणे सर्व गोष्टींना सामोरे जाल. जर तुम्ही बजेट केलं, तर तुम्ही पैसे वाचवू शकाल.

मूलांक सहा

कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक सहा असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची प्रचंड शक्यता आहे. या वर्षी कुटुंबातील सदस्यांचे खूप सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विवाहितांसाठीही हे वर्ष चांगले आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. या वर्षी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. उत्पन्न चांगले राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 2022 rashifal going to be a special year for people with this date of birth ttg