Summer Health Tips : या वर्षी एप्रिल, मे, जूनएवढी उष्णता मार्चमध्येच जाणवू लागली आहे. दुपारी घराबाहेर पडताच घामाने भिजायला होतेय. कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. या दिवसांत शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने आरोग्य बिघडते. अनेकांना थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. त्यावर मात करण्यासाठी आणि कडक उन्हातही शरीर एकदम ताजेतवाने ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही नक्की फॉलो करू शकता.
कडक उन्हापासून प्रत्येकालाच स्वतःचे रक्षण करायचे आहे. अशा वेळी आरोग्याबद्दल थोडासाही निष्काळजीपणा गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. या ऋतूमध्ये उष्माघात, थकवा आणि पोटाचे आजार या सामान्य समस्या आहेत; पण त्या टाळण्यासाठी ताजेतवाने वाटण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.
उन्हाळ्यात शरीर कसे थंड आणि स्वास्थ्यकर ठेवायचे?
१) नारळ पाणी आणि सबजाचे बियाणे
उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे दिवसभर आळसपणा, थकवा जाणवतो. ऋजुता दिवेकर दररोज दुपारी १२ वाजण्यापूर्वी एक ग्लास नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.
कसे घ्यावे? : सबजाच्या एक चमचाभर बिया नारळाच्या पाण्यात मिसळा आणि ते पाणी प्या. ऋजुता दिवेकर यांनी स्पष्ट केले की, सबजा आणि चिया सीड्स वेगवेगळ्या आहेत आणि तुम्हाला सबजाच्या बिया वापरायच्या आहेत.
फायदे : नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम व मॅंगनीज असते. नारळ पाणी शरीराला एक नैसर्गिक थंडावा देते, ज्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवता येते आणि पचनक्रिया सुधारते.
२) दुपारच्या जेवणात दही किंवा ताक
दुपारच्या जेवणात दही किंवा ताक घ्या. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी खास टिप्स दिली.
काय करावे? : दुपारच्या जेवणात दही किंवा ताक घ्या; पण त्यात भाजलेल्या ताज्या जिऱ्याची पावडर करून, ती मिसळा.
फायदे : दही आणि जिरे हे दोन्हीही घटक थंडावा देणारे आहेत. त्यामुळे तुमच्या पोटात थंडावा निर्माण करण्यास मदत होते.
३) संध्याकाळी किंवा जेवणानंतर केळे खा
केळे हे फक्त एक फळ नाहीये, तर तो पोटाच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. ऋजुता यांच्या मते, संध्याकाळी किंवा जेवणानंतर केळी खाणे आवश्यक आहे.
फायदे : केळी पोटासाठी खूप चांगली मानली जातात. कारण- त्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. ती तुमचे पोट हलके ठेवण्यास आणि सकाळी आतड्यांमधील घाण साफ करण्यास मदत करतात.
महिलांसाठी खास टिप्स
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी विशेषतः अशा महिलांना खास टिप्स दिल्यात, ज्या पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या फेजमध्ये आहेत. या काळात त्यांच्यातील हार्मोनल बदल पचनक्रिया मंदावू शकतात आणि गॅसची समस्या वाढवू शकतात.
