Dental Health Tips :आपण बहुतेक वेळा ओरल हेल्थ म्हणजेच तोंडाचे आरोग्याकडे लक्ष देत नाही. तोंडाची स्वच्छता म्हणजे फक्त फक्त ब्रश करणे आणि चूळ भरणे एवढ्यापुरती मर्यादित नाही. वैद्यकीय संशोधनानुसार दातांना किड लागणे आणि हिरड्यां आजार हे शरीरातील इतर गंभीर समस्यांचे संकेत ठरू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या रोजच्या काही सवयी, ज्या आपण अगदी सामान्य समजतो, त्या प्रत्यक्षात दातांसाठी “सायलेंट किलर” ठरू शकतात आणि हळूहळू दातांच्या मुळांना कमकुवत करतात.

कॅनडामध्ये जन्मलेले दंततज्ज्ञ आणि संशोधक डॉ. वेस्टन ए. प्राइस यांनी पोषण, दात आणि शरीराच्या एकूण आरोग्यामधील घट्ट संबंध स्पष्ट केला आहे. त्यांच्या संशोधनानुसार, जेव्हा लोक पारंपरिक आहार सोडून प्रोसेस्ड आणि आधुनिक आहाराकडे वळतात, तेव्हा दातांची कीड आणि इतर अनेक आजारांची शक्यता वेगाने वाढते.

आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या ‘क्लिनिकल डिस्कव्हरी सीनियर्स’ या हेल्थ एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ऑस्ट्रेलियन हेल्थ एज्युकेटर, लेखिका आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचा प्रचार करणाऱ्या बार्बरा ओ’नील यांनी सांगतात की, दातांचे आरोग्य हे मानसिक ताण आणि आहाराशी थेट जोडलेले आहे. ताण वाढल्यावर दात घासणे किंवा चुकीचा आहार घेणे या सवयींमुळे इनेमलचे (दाताचा सर्वात बाहेरचा आणि सर्वात कठीण थर) नुकसान होऊ शकते आणि वेळेआधी दात पडण्याचा धोका वाढू शकतो.

Award Banner

ताणाचा दातांच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? (How Stress Affects Dental Health)

मानसिक ताणाचा परिणाम केवळ मेंदूवरच नाही, तर दातांवरही होतो. तज्ज्ञांच्या मते, ताण वाढल्यावर लाळ (Saliva) अधिक आम्लीय बनते. अशा वेळी लाळ दातांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्या दांताचे बाहेरील आवरण हळूहळू कमकुवत करते. त्यामुळे दीर्घकाळ ताण सहन करत राहिल्यास दात किडणे आणि हिरड्यांते आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.

दातांना हानी पोहोचवणाऱ्या ४ धोकादायक सवयी (Four Harmful Habits That Damage Teeth)

दातांची योग्य स्वच्छता न करणे (Poor Dental Cleaning Habits)

दातांमध्ये अडकलेले अन्न जर वेळेवर काढले गेले नाही, तर ते बॅक्टेरियासाठी पोषक ठरते. या बॅक्टेरियामुळे तयार होणारे टॉक्सिन दातांच्या बाहेरील आवरणाला धक्का पोहोचवतात. त्यामुळे फक्त ब्रश करणे पुरेसे नसून दातांची सखोल स्वच्छता करणे आवश्यक आहे.

जास्त साखर सेवन (Excess Sugar Intake)

साखर ही दातांसाठी सर्वात मोठी शत्रू मानली जाते. साखरयुक्त पेये आणि पदार्थांमुळे तोंडातील बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया आम्ल तयार करतात, जे दातांच्या बाहेरील आवरणाला कमकूवत करतात. त्यामुळे गोड पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

दात एकमेकांवर घासणे (Teeth Grinding or Bruxism)

झोपेत किंवा नकळत दात एकमेकांवर घासण्याची सवय, ज्याला ब्रुक्सिझम म्हणतात, दातांसाठी अत्यंत घातक ठरते. विशेषतः ताणामुळे ही समस्या वाढते आणि दातांचे झीज होण्याचा धोका वाढतो.

खूप जोरात ब्रश करणे (Hard Brushing)

अनेकजण दात जोरात घासले तर ते अधिक स्वच्छ होतील असे समजतात. मात्र हार्ड ब्रशिंगमुळे मसूडे मागे सरकू शकतात आणि दात लवकर कमकुवत होऊ शकतात.

ओरल हेल्थ सुधारण्यासाठी उपयुक्त सवयी (Ways to Improve Oral Health)

ब्रशसोबत फ्लॉसिंग आणि क आवश्यक (Flossing and Rinsing Are Essential)

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक जेवणानंतर कुल्ला करणे फायदेशीर ठरते. मीठाच्या पाण्याने किंवा हलक्या बेकिंग सोडाच्या पाण्याने तोंड स्वच्छ केल्यास बॅक्टेरिया कमी होतात. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉसिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण रात्री बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात.

ऑयल पुलिंग — पारंपरिक पण प्रभावी उपाय (Oil Pulling as a Traditional Remedy)

ऑयल पुलिंग ही जुनी पण प्रभावी पद्धत मानली जाते. यामध्ये नारळाचे तेल तोंडात काही वेळ तोंडात ठेवून थुंकले जाते. त्यामुळे तोंडातील टॉक्सिन कमी होण्यास मदत होते, लाळग्रंथी सक्रिय होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून १–२ वेळा ऑयल पुलिंग केल्यास बॅक्टेरिया नियंत्रित राहू शकतात.

दातांसाठी उपयुक्त अन्नपदार्थांचा समावेश (Tooth-Friendly Foods in Diet)

काही नैसर्गिक अन्नपदार्थ दातांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. उदाहरणार्थ, सफरचंदासारखी कुरकुरीत फळे चावल्यामुळे लाळ अधिक तयार होते, ज्यामुळे दात स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच गाजर, काकडी आणि सेलेरी यांसारख्या भाज्या दात आणि जबड्यांना मजबूत ठेवतात.

पाणी आणि मिनरलयुक्त आहाराचे महत्त्व (Importance of Hydration and Mineral-Rich Diet)

संशोधनानुसार मिनरल्सयुक्त आहार, पुरेसे पाणी पिणे आणि ताण नियंत्रणात ठेवणे यामुळे दातांच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना मिळते. म्हणजेच दात निरोगी ठेवण्यासाठी मोठ्या उपचारांची आवश्यकता नसून, दैनंदिन सवयींमध्ये छोटे बदल करणे अधिक परिणामकारक ठरते.

निष्कर्ष (Conclusion)

दात दीर्घकाळ मजबूत आणि निरोगी ठेवायचे असतील, तर रोज पुरेसे पाणी पिणे, जेवणानंतर कुल्ला करणे, नियमित फ्लॉसिंग, ऑयल पुलिंग आणि साखरेचे सेवन नियंत्रित ठेवणे या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. दातांची योग्य काळजी ही केवळ सौंदर्यासाठी नाही, तर एकूण आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञ सांगतात.