40 Minutes Cooking Rule: भात कसा शिजवाल? पोळी कशी भाजाल? डाळीला फोडणी देताना काय वापराल असे असंख्य व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. काही प्रमाणात याचा अवलंब करून पाहण्यात नुकसान होत नाही पण डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा तज्ज्ञांच्या माहितीवर आधारित गोष्टींचा अवलंब केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. आज आपण ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या एका कुकिंग पद्धतीवर तज्ज्ञांचे मदत जाणून घेणार आहोत. ही कुकिंग पद्धत म्हणजे ‘४० मिनिट रुल’. सोप्या मराठीत सांगायचं तर जेवणात विशिष्ट भाज्या बनवण्यासाठी वापरला जाणारा ‘४० मिनिटांचा नियम’. क्रुसिफरस भाज्या म्हणजे साधारण लहान कळ्यांसारखा दिसणाऱ्या भाजीची जुडी. उदाहरणार्थ, फ्लॉवर, ब्रोकोली इत्यादी. या भाज्यांचे पूर्ण पोषण मिळण्यासाठी ४० मिनिटांचा नियम पाळावा अशी एक पोस्ट ऑनलाईन चर्चेत आली आहे. आता हा नियम नेमका काय? त्याचे पालन करावे का आणि केल्यास त्यातून तुमचा किती फायदा होऊ शकतो हे पाहूया..

नेमका दावा काय?

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “स्वयंपाक करण्यापूर्वी ४० -४५ मिनिटे फ्लॉवर किंवा ब्रोकोलीसारख्या भाज्या चिरून ठेवल्यास, त्यात सल्फोराफेन सोडण्यासाठी रासायनिक अभिक्रिया होते, सल्फोराफेन हा कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ओळखला जाणारा सक्रिय घटक आहे,”

Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र
settlement in Criminal case is not divorce
फौजदारी प्रकरणातील समझोता म्हणजे घटस्फोट नव्हे!
Career
मुलांचं करिअर घडवायचं आहे, पण कसं? प्रत्येक आईने ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात!

तज्ज्ञ सांगतात की..

यासंदर्भात इंडियन एक्सस्प्रेसने जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांच्याशी बातचीत केली असता, सुषमा यांनी सांगितले की, “अशा भाज्यांमध्ये ग्लुकोराफेनिन हे एक संयुग असते. भाजी चिरल्यावर जेव्हा हवेच्या संपर्कात येते तेव्हा या संयुगासह मायरोसिनेज या एन्झाइमद्वारे रासायनिक अभिक्रिया सुरु होते. ही प्रतिक्रिया ग्लुकोराफेनिनचे सल्फोराफेनमध्ये रूपांतरित करते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असून त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.”

आहारतज्ज्ञ सिमरत भुई यांनी सुद्धा याविषयी सोप्या शब्दात सांगितले की, “या भाज्यांमधील ग्लुकोराफेनिन नावाचे रसायन शरीरातील मायरोसिनेज नावाच्या एंझाइममध्ये मिसळते, ज्यामुळे सल्फोराफेन – एक प्रकारचा फायटोकेमिकल तयार होतो. “फायटोकेमिकल्समध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असतात आणि पेशींचे ऑक्सिडेशन कमी करून विविध रोगांपासून संरक्षण देतात,”

चिरलेल्या भाज्या ४०-४५ मिनिटे बाजूला ठेवून मग शिजवाव्यात का?

तज्ज्ञांचा आग्रह आहे की स्वयंपाक करण्यापूर्वी चिरलेल्या भाज्यांना ४०-४५ मिनिटे असेच राहू देणे महत्वाचे आहे. सुषमा यांच्या म्हणण्यानुसार, “हा कालावधी कालावधी मायरोसिनेज सक्रिय करतो आणि ग्लुकोराफेनिनचे सल्फोराफेनमध्ये रूपांतर करतो, ज्यामुळे या भाज्यांची पोषणमूल्ये वाढू शकतात”.

हे ही वाचा<< तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र

भुई म्हणतात की, सल्फोरोफेन मुख्यतः फ्लॉवर, ब्रोकोली, कोबी, ब्रसेल्स, स्प्राउट्स, केल इत्यादी क्रूसीफेरस भाज्यांमध्ये आढळते, त्यातही ब्रोकोली हा हा याचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणून ओळखला जातो. तसेच याही पुढे जाऊन तुम्हाला भाज्यांमधील पोषणसत्व टिकवून ठेवायची असतील तर वाफेवर भाज्या शिजवणे सर्वात फायद्याचे आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पुढच्या वेळी अशा प्रकारच्या भाज्या करताना वेळेची ही छोटीशी गुंतवणूक करण्याचा पर्याय नक्कीच विचारात घेता येईल.