scorecardresearch

Hair Care Tips: कडक उष्णतेमुळे केस खराब होताय? तर ‘या’ ५ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या काळजी

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ आपल्या त्वचेवरच नाही तर केसांवरही होतो. सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांमुळे आपल्या केसांमधील सर्व आर्द्रता निघून जाते आणि केस कोरडे होतात.

उन्हाळ्यात केस खराब होण्याचा धोका जास्त असतो. (photo credit: freepik)

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ आपल्या त्वचेवरच नाही तर केसांवरही होतो. सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांमुळे आपल्या केसांमधील सर्व आर्द्रता निघून जाते आणि केस कोरडे होतात. जास्त कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या देखील उद्भवते. सूर्याच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे क्युटिकल्स उघडतात आणि केस कोरडे होतात. या ऋतूत खूप घाम येतो. घामामुळे केस चिकट होतात. तुम्ही तुमचे केस कितीही कोरडे केले तरी ते ओले वाटतात.

उन्हाळ्यात केस खराब होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूमध्ये केसांची काळजी न घेतल्यास केस कोरडे, निर्जीव आणि चिकट दिसतात. तुम्हालाही उन्हाळ्यात केसांची काळजी घ्यायची असेल तर काही खास पद्धतीने केसांची काळजी घ्या. तसेच काही टिप्स सांगत आहोत ज्याचा अवलंब तुम्ही उन्हाळ्यात केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी करू शकता. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी.

खोबरेल तेल वापरा

उन्हाळ्याच्या या दिवसात केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते, त्यामुळे खोबरेल तेल केसांसाठी खूप प्रभावी ठरते. खोबरेल तेलामध्ये फॅटी अॅसिड, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. याचा वापर केल्याने उन्हाळ्यात केसांना पोषण मिळते. खोबरेल तेलाने केसांना मसाज करा, याने तुम्हाला केस चांगले ठेवण्यास फायदा होईल.

बाहेर जाताना केसांना झाकून घ्या

उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यावर केस झाकून घ्या. केस झाकण्यासाठी, तुम्ही केसांवर स्कार्फ, टोपी किंवा छत्री वापरू शकता.

लिंबाचा रस वापरा

उन्हाळ्यात अति प्रमाणात खाम येतो आणि या घामामुळे केस चिकट होतात. केसांची काळजी घेण्यासाठी केसांना लिंबाचा रस वापरा. अर्धा तास केसांना लिंबाचा रस लावल्यानंतर धुवा, असे केल्याने केसांचा चिकटपणा कमी होईल.

केसांचा सनस्क्रीन वापर करा

कडक उष्णतेमुळे केस खराब होतात, केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. केसांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी हेअर सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन त्वचेची जशी काळजी घेते तशी केसांची सनस्क्रीन केसांची काळजी घेते.

केसांना सीरम लावा

उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांना सिरम लावा. सीरम लावल्याने कुरळे केसही लवकर सुटतात आणि केस तुटण्याची भीती कमी होते.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 best home remedies for stickiness of hair scsm

ताज्या बातम्या