मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यातील पहिले तीन दिवस महिलांसाठी खूप त्रासदायक असतात. यादरम्यान महिलांना अनेक समस्या येतात, काहींना पोटदुखीची तक्रार असते, तर काहींना पाठदुखी किंवा पाय दुखत असतात.

ज्या महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते त्यांना मासिक पाळीत जास्त वेदना होतात. या कालावधीत वेदना होण्याची इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की गर्भाशयाचे आकुंचन, गर्भाशयाला सूज येणे आणि त्यात रक्ताची कमतरता. तुम्हालाही दर महिन्याला या असह्य वेदनेचा सामना करावा लागत असेल, तर या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास आणि प्रभावी टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळेल.

lifestyle
जाणून घ्या, मासिक पाळीच्या व्यतिरिक्त ‘या’ दिवसात महिलांच्या पोटात तीव्र वेदना का होतात!
pregnancy early sign
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
Healthy Breakfast Recipes Indian Ragi idli recip
रविवारी नाश्त्यात रोजच्या इडलीऐवजी बनवा नाचणीची इडली; पटकन नोट करा सोपी रेसिपी

ओव्याचे सेवन करा

मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर करा. एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घ्या. ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. गॅसवरून पाणी काढून ते ओव्याचे पाणी कोमट झाल्यावर प्या. दिवसातून दोनदा या पाण्याचे सेवन केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.

हळदीचे दूध प्या

मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी हळदीचे दूध खूप प्रभावी आहे. एक कप दुधात एक चमचा हळद टाकून दूध गरम करा. दुधात थोडासा गूळ, अर्धा चमचा ओवा आणि सुंठ मिसळून सेवन करा, याने तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

गरम पाण्याने पोट व पाठीला शेक द्या

मासिक पाळी दरम्यान वेदना कमी करण्यासाठी तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा. या दिवसात अधिक पाणी प्या. पोट आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी गरम पाण्याने शेक द्या. गरम पाण्याच्या कॉम्प्रेसने पोटाची सूज कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.

आहाराने वेदनांवर उपचार करा

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी तुमचा आहार देखील खूप प्रभावी ठरू शकतो. आहारात स्प्राउट्स, बीन्स, हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा यांचे सेवन करावे. हे अन्न तुमच्या स्नायूंना आराम देईल.

चहा आणि कॉफी टाळा

मासिक पाळीत चहा आणि कॉफीचे सेवन केल्याने तुम्हाला गॅसची तक्रार होऊ शकते. मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा गॅसची तक्रार असते, अशा कॅफिनमुळे वेदना वाढू शकतात. या दरम्यान तुम्ही फळे आणि भाज्यांपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन करावे.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)