Right Way To Drink Water : आपल्या शरीराचा ७० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. अशा वेळी निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. पण एवढेच पुरेसे आहे का? यासंदर्भात प्रसिद्ध हेल्थ एक्स्पर्ट डॉ. शालिनी सिंग साळुंके यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, योग्य प्रमाणात पाणी पिणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते योग्य पद्धतीने पिणे अधिक महत्त्वाचे आहे. ९०% लोक इथेच चूक करतात.

डॉक्टर सांगतात की, अनेकदा लोक ५ ते ६ लिटर पाणी पितात, पण ते पाणी त्यांच्या पेशींपर्यंत (Cells) पोहोचूच शकत नाही. हेच कारण आहे की, पुरेसे पाणी पिऊनही शरीरात पाण्याची कमतरता भासणे, थकवा, अशक्तपणा आणि किडनी स्टोनसारखी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी डॉक्टरांनी पाणी पिण्याचे हे ५ नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.

पाणी पिण्याचे हे ५ नियम तुम्हाला ठेवतील निरोगी:

नियम १: सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या
डॉ. शालिनी यांच्या मते, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही किमान दोन ग्लास कोमट पाणी प्यायला हवे. रात्रभर पाणी न मिळाल्यामुळे आपले शरीर डिहायड्रेट होते; अशा वेळी उठल्याबरोबर पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास मदत होते.

नियम २: नेहमी हळूहळू आणि घोट-घोट पाणी प्या
पाणी पिताना कधीही घाईगडबड करू नये. पाणी नेहमी शांतपणे घोट-घोट करून प्यावे. असे केल्याने शरीर पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेते, ज्यामुळे पेशींपर्यंत पुरेसे हायड्रेशन पोहोचण्यास मदत होते.

नियम ३: नेहमी बसूनच पाणी प्यावे
डॉ. शालिनी यांच्यानुसार, पाणी नेहमी आरामात बसून प्यावे. चालता-चालता किंवा उभे राहून पाणी पिण्याची सवय योग्य मानली जात नाही. जेव्हा आपण बसून शांतपणे पाणी पितो, तेव्हा शरीर ते उत्तम प्रकारे शोषून घेते. आयुर्वेदातही बसून पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला आहे.

नियम ४: जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका
जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय योग्य नाही. जेवण झाल्यानंतर कमीत कमी एक तास थांबून मगच पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.

नियम ५: ठराविक अंतराने पाणी पिण्याची सवय लावा
दिवसभरात पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत दर तासाला एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. अनेक लोक खूप तहान लागेपर्यंत वाट पाहातात, पण तोपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता सुरू झालेली असते. त्यामुळे हा नियम पाळणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.