Dark Spot Causes: आत्ताच सोडा या सवयी, नाहीतर चेहऱ्यावर येतील डाग, तजेलदार त्वचा मिळण्यासाठी काय कराल? | Loksatta

Dark Spot Causes: आत्ताच सोडा या सवयी, नाहीतर चेहऱ्यावर येतील डाग, तजेलदार त्वचा मिळण्यासाठी काय कराल?

या सवयी सोडल्यावर चेहऱ्यावरील डाग निघून जातील, वाचा सविस्तर माहिती

Dark Spot Causes: आत्ताच सोडा या सवयी, नाहीतर चेहऱ्यावर येतील डाग, तजेलदार त्वचा मिळण्यासाठी काय कराल?
चेहरा सुंदर दिसण्यासाठी या वाईट सवयी सोडा. (image-freepik)

जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाची त्वचा सुंदर आणि तजेलदार असते. पण जस जसं वय वाढत जातं त्वचेच्या समस्याही निर्माण होत राहतात. काही जण सौंदर्यात भर घालण्यासाठी त्वचेची नेहमी काळजी घेतात. पण काहींना वाईट सवयी असल्यामुळं त्वचेची काळजी घेण्याचा कंटाळा येतो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी नियमितपणे त्वचेच्या समस्यांवर उपाय करावे लागतात. पण काही माणसांमध्ये असलेल्या पाच वाईट सवयी त्यांच्या चेहऱ्यावर डाग येण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे.

तुम्ही कोणता आहार घेता? तुम्ही कसे झोपता? कोणत्या प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करता? चेहरा कशाप्रकारे धुता? या गोष्टींवर तुमच्या चेहऱ्याचा तजेलदारपण अवलंबून असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला वेळ मिळाल्यावर काही चुकीच्या सवयींना कायमचा पूर्णविराम लावला पाहिजे. यामुळे त्वेचवर निर्माण होणारे डागांची समस्या उद्भवणार नाही आणि ते त्वेचवर दिसणार नाहीत. त्यामुळे जाणून घेऊयात या सवयींबाबत

नक्की वाचा – वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील

या कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग येतात

चेहरा न धुताच झोपणे

काही आळशी माणंस रात्रीच्या वेळी चेहरा न धुताच झोपतात. पण चेहरा न धुताच झोपणं तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतं. चेहरा न धुताच झोपल्याने तुमच्या चेहऱ्यावर घाण, धूळ, मातीचे कण राहतात. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ न ठेवल्यास तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता अधिक वाढते.

मानसिक ताणतणावावर नियंत्रण न ठेवणे

जोपर्यंत तुम्ही तणावातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तुमच्या त्वचेवर तेज दिसणार नाही. तुम्ही कितीही चांगल्या आणि महाग क्रिम लावल्या तरीही अशा परिस्थितीत या गोष्टींचा सकारात्मक परिणाम होत नाही. मानसिक आरोग्य सुदृढ नसल्यावर तुमच्या शरीरात हार्मोनल बदल होतात आणि याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होतो. तुमच्या चेहऱ्यावर डाग येतात.

नक्की वाचा – Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक

चुकीचा आहार घेणे

चेहऱ्यावरील त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही पोषक आहार घेतला पाहिजे. तेलयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाल्ल्यानेही चेहऱ्यावर डाग येऊ शकतात. संतलीत आहार न घेणे हे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स निर्माण व्हायला कारणीभूत ठरतात. तसंच धुम्रपान आणि अल्कोहोलचं व्यसनंही त्वचेच्या समस्या निर्माण करतात.

सनस्क्रीनचा वापर न करणे

सनस्क्रीन फक्त उन्हात फिरत असल्यावरच लावली पाहिजे असं नाही. तर सनस्क्रीनला हार्श लाइट आणि हिवाळ्यातील मोसमातही लावणे त्वेचसाठी फायदेशीर ठरतं. या सनस्क्रीनचा लावण्याचा फायदा तुमच्या त्वचेवरील डाग कमी होण्यासाठी होतो. त्यामुळे हेल्दी त्वचा राहण्यासाठी सनस्क्रीनचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक आहे.

त्वचेवर नखे लावणे

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर काही माणसं त्यांना नखाने फोडण्याचा प्रयत्न करतात. तसंच ब्लॅकहेड्स किंवा उभरत्या त्वचेला नखाने खेचतात. यामुळे त्वचेचा तजेलदारपणा कमी होतो. असं केल्याने त्वचेची समस्या निर्माण होऊन डाग येण्याची शक्यता वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 20:35 IST
Next Story
पालकसोबत ‘हे’ ३ पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्यावर होणार गंभीर परिणाम